Lockdown: सांगवीत पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत
पिंपरी (लोकमराठी) : सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये हा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला. यावेळी ज्या भागातून हा रुट मार्च गेला तिथल्या लोकांनी घरातून पोलिसांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं.
दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये पुन्हा ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी चोख भूमिका बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.
करोना विषाणूचा फैलाव सुरुच असून भारतात अनेकांचा आपला जीव गमवाव लागला आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करूनही ते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करीत अनेकांना काठीचा प्रसादही दिला होता. या कारवाईमुळं लोकांचं घराबाहेर पडणं काहीसं कमी झालं.
ज्या भागात पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्यांना काठ्यांचा प्रस...