डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
पुणे : रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत "दक्षता जागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले होते.
'सतर्क भारत - समृद्ध भारत' ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात कार्यालयाच्या दर्शनी भागात मोजक्या ठिकाणी भित्तीपत्रक व कापडी फलक लावण्यात आले. तसेच दक्षता जनजागृतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा परीक्षा घेण्यात आली.&nbs...