Tag: Dr Vishwambhar Choudhari

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?
मोठी बातमी, विशेष लेख

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

डॉ. विश्वंभर चौधरी १. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. 'काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे' अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी 'असहकार' असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता. २. जो शब्द नेहरू विरोधकांना अजिबात आवडत नाही, 'समाजवाद' त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू एक गट आणि मोतीलाल नेहरू, सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं क...