ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने
रोहित आठवले
उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅक ऑईलचा ट्रेण्ड मागे पडून गार्बेज गोल्डने जोर धरला असून, शहरातील या कचऱ्यावर आपल्या घरात हिरवळ फुलविणारे बहरू लागले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील कारखान्यांना पूर्वी ऑईलची गरज भासत होती. त्यातून या ऑईलचा काळाबाजार सुरू झाला. ब्लॅक गोल्ड म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेकांनी यावर घरं भरली. पण नंतर तंत्रज्ञानात बदल होत जाऊन ही मागणी रोडावली. त्यामुळे याचा काळाबाजारही कमी झाला. पण शहरातील वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी दाखल झालेल्यांच्या घरात कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्याला नेते मंडळींनी आपलंस करायला सुरुवात केली.
कचरा कोण उचलणार, तो नेऊन कोण टाकणार, त्यातून भंगार कोण वेगळे करणार, वेगळे केलेले भंगार डेपोतून बाहेर कोण आणणार, पुढे ते जालना आणि मुंबईला कोण पाठवण...