Tag: Kokan

गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा – रुपेश मोरे
पुणे

गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा – रुपेश मोरे

पुणे (Lokmarathi) : जुलै महिण्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्सखलनाच्या घटना घडल्या. अनेक रस्ते, ओढ्या, नाल्यांवरील पुल वाहुन गेले. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 19 सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी पुणे - पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक कोकणात जातील. त्यांना जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतू मागील महिण्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत अशी मागणी कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कोकण खेड युवाशक्तीच्या वतीने मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुणे...
कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे 
पुणे

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे

पुणे (लोकमराठी न्यूज) : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मेत्रे वस्ती (चिखली) येथे करण्यात आला. उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग, सचिवपदी प्रा. संदीप सकपाळ, सहसचिवपदी समीर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदारपदी नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी कैलास मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम व युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल...
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं
विशेष लेख

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं

लोकमराठी : इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून ३० जुलैला कोकणातील पोलादपूरला भेट देण्यात आली. या भेटीबद्दलचा वृत्तांत सांगत असतानाच, पोलादपूरला मदत देणाऱ्या राज्यभरातल्या सामाजिक, राजकीय संस्थाना फाउंडेशनतर्फे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. १. आपण आणलेली मदत कोणाच्याही हाती देऊ नका, हवतर मदतीचा ट्रक, टेम्पो गावाच्या बाहेर ठेवून आधी गावात एक चक्कर मारून या आणि मगच मदत कोणाला द्यायची ती ठरवा. २. आम्ही जे पाहिलं ते अतिशय भयानक अवस्थेतील चित्र की, सारखी सारखी काही मोजक्या ठिकाणीच मदत जात आहे. आणि उरलेले लोक अक्षरशः भीक मागल्यासारखे गयावया करत, जवळ येऊन गर्दी करत लोकांना मदत मागत आहेत. ३. महाड आणि बाजूच्या शहरात आणि शहराच्या बाहेर खूप घाण कचरा असल्यामुळे आता दुर्गंधी निर्माण झाली आहे त्याचाच परिपाक लेप्टोस्पायरसिस मध्ये बदलेल हे नक्की. त्याच मुळे ...
काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे,...
नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश
पिंपरी चिंचवड

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती. त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....

Actions

Selected media actions