Tag: Marathi News

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर 16 (प्रतिनिधी) : पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद आहे. लोकांनी वेळ काढून तलाव, माळरान, जंगल, पाणथळ जागेत जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे. असे विचार वाडिया कॉलेजचे प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना सांगितले की, भारताच्या भूमीत विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतो. जैवविविधता आपण समजून घेतली पाहिजे. पक्षांचे संवर्धन आपण केले पाहिजे. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पांढरबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सोपान ऐनार यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, फोटोग्राफी, निबंध, बर्ड नेक्स्ट, मेकिंग वर्कशॉप या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हेमलता कारकर यांनी का...
राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेत एस. एम. जोशी महाविद्यालयातील ऋतुजा भाडळे प्रथम 
पुणे, शैक्षणिक

राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेत एस. एम. जोशी महाविद्यालयातील ऋतुजा भाडळे प्रथम

हडपसर, 14 (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेसाठी एस. एम. जोशी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे 5 नोव्हेंबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. इंद्रधनुष्य 2022 या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 22 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील ऋतुजा तानाजी भाडळे (SYBA) या विद्यार्थिनीने एकांकिका (One act play) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी सर्वात जास्त पारितोषिके मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय क्रमांक मिळविला. इंद्रधनुष्य 2022 राज्यस्तरीय युवक महोत्सव स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...
मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी
विशेष लेख

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी

श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एस. एम. जोशी (एस. एम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १२ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कोकणमधील रत्नागिरीजवळील 'गोळप' हे होय. त्यांचे (S M Joshi) शिक्षण बी.ए., एल.एल.बी., डी.लीट. असून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लीट या पदवीने त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मानित केले होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यात तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला वारंवार आला. अशा या तुरुंगवासातील दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासली. या दिवसांत कार्ल मार्क्सच्या विविध ग्रंथांचे वाचन, विविध साप्ताहिकांतील अग्रलेखांचे वाचन, गुजराती कादंबऱ्यांचे वाचन, मानवेंद्रनाथ रॉय यांचे 'Tasks before us' या पुस्तकाचे वाचन. इत्यादी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते. याव्यतिरिक्त तुरुंगामधी...
उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश
विशेष लेख

उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

जयश्री इंगळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे अजून दोन वर्षे असणार आहे. गेल्या काही वर्षातील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ अल्प होता. त्यातही या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतची आणि पदावर असतांनाची कारकीर्द वादग्रस्त म्हणावी लागेल. (दीपक मिश्रा, बोबडे, गोगोई आणि लळीत). सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देखील भूतकाळातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. अलिकडच्या काळातील अनेक ऐतिहासिक निकाल देणार्‍या खंडपीठांचा ते सदस्य होते आणि त्यांचे अनेक निर्णय उदारमतवादी आणि पुरोगामी आहेत. त्यातील काही महत्त्वाचे निवाडे खालीलप्रमाणे: 1) 20 ते 24 आठवडे गर्भवती असलेल्या अविवाहित महिलांना विवाहित महिलांप्रमाणे सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार देणे. 2) वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवणे. 3) इच्छा...
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा 
महाराष्ट्र, मोठी बातमी

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते....
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध 
पिंपरी चिंचवड, राजकारण

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध

अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेऊन पदमुक्त करा - अजित गव्हाणे बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ०७ : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजाबदार वक्तव्ये सुरू असून तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत अश्लाघ्य, निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वा...
पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 
विशेष लेख, मनोरंजन, मोठी बातमी

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

'हर हर महादेव' हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे. पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण 'पुरुष म्हणजे मर्द' अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बाळंतपण...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन

हडपसर, दि. ५ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील प्लेसमेंट सेल, माजी विद्यार्थी समिती व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात SBI, Airtel, Kotak Mahindra, ICICI, HDFC & Altruist इतर कंपन्या आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना जॉबची ऑफर दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड होईल त्या विद्यार्थ्यांना 18 ते 20 हजार रुपयांपर्यंत पगार देण्याची ऑफर दिली आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, महाविद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला एका हातात डिग्री सर्टिफिकेट मिळावे व दुसऱ्या हातात जॉबचे अपॉइंटमेंट लेटर मिळावे. अशा हेतूने महाविद्यालयात प्लेसमेंट प्रोग्र...
काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू 
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू

पिंपरी : डेंग्यू झाल्याने काळेवाडीतील एका २२ वर्षीय तरुण शिक्षिकेचा शुक्रवारी (ता. ४) एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. शिक्षक घराण्यातील ही तरुणी नुकतीच पिंपरीतील पोतदार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. ऋतुजा श्रावण भोसले (वय २२ रा. साईनाथ कॉलनी, काळेवाडी) असे या मृत शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, ऋतुजाचे वडील श्रावण भोसले हे देखील काळेवाडीतील एका शिक्षण संस्थेत क्रिडा शिक्षक आहेत. ...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेना 2 महाराष्ट्र बटालियन मार्फत सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एकता शपथ, युनिटी रन व मार्च पास आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 25 कॅसेट्स सहभागी झाले होते. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व कॅसेट्स युनिटी रन मध्ये अतिशय उत्साहात सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. के. बी. पठाडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. सुनील खुंटे यांनी केले....