एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेना 2 महाराष्ट्र बटालियन मार्फत सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एकता शपथ, युनिटी रन व मार्च पास आयोजित करण्यात आला होता.

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 25 कॅसेट्स सहभागी झाले होते. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व कॅसेट्स युनिटी रन मध्ये अतिशय उत्साहात सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. के. बी. पठाडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. सुनील खुंटे यांनी केले.