एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न
हडपसर 16 (प्रतिनिधी) : पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद आहे. लोकांनी वेळ काढून तलाव, माळरान, जंगल, पाणथळ जागेत जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे. असे विचार वाडिया कॉलेजचे प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना सांगितले की, भारताच्या भूमीत विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतो. जैवविविधता आपण समजून घेतली पाहिजे. पक्षांचे संवर्धन आपण केले पाहिजे. असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पांढरबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सोपान ऐनार यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, फोटोग्राफी, निबंध, बर्ड नेक्स्ट, मेकिंग वर्कशॉप या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हेमलता कारकर यांनी का...










