Tag: Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (बाळासाहेब मुळे) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी याठिकाणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वैशाली काळभोर, दत्तात्रय जगताप, विजय लोखंडे, संगीता कोकणे, वर्षा जगताप आवटी, गोरक्ष लोखंडे, सुगंधा पाषाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट
पिंपरी चिंचवड

महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : शहराच्या महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) मोशी कचरा डेपोला अचानक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी कचरा डेपोची व्यवस्थित पाहणी केली. कचरा डेपोमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली. महापौर कचरा डेपोमध्ये येणार, यामुळे डेपो प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली होती. यावेळी कचरा डेपोचे प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. त्याचबरोबर कचरा डेपोच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या सुतीस्का सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली....
महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित
पिंपरी चिंचवड

महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये १ जुलैपासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले होते. परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे? असा सवाल करीत आज शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महापौर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अपना वतन संघटनेच्या वतीने पे अँड पार्क धोरण रद्द करून स...
पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’

शहरात 'बूथ सक्षमीकरण' अभियान; कार्यकर्त्यांच्या 'डोअर टू डोअर' भेटी-गाठी! मोहननगरमधील भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मिशन १००+' हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा 'शड्डू ठोकला' आहे. शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.१७) पक्षाच्या 'बुथ सक्षमीकरण' अभियानाला सुरवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक १४ पासून स्वतः भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या 'डोअर टू डोअर' भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपाचा हा 'बूथ सक्षमीकरण' पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा

पिंपरी चिंचवड : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल विचार मांडताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे म्हणाले की, पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठनकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तेरा लोकनाट्य, तीन नाटके, चौदा कथासंग्रह, पस्तीस कादंबर्यां, एक शाहिरी ग्रंथ, पंधरा पोवाडे, एक प्रवास वर्णन, सात चित्रपट कथा, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विविध साहित्य लिहिणारे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या चौकाचौकात छत्रपती शिवरायांची किर्ती पो...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

पिंपरी चिंचवड : राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल जाहीर झाला आहे. चौधरी निशा बाबूलाल हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला. तर परमार साहिल जगदिश याने 90.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. सोळंकी आरती महेंद्र हिने 87.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक तर चौधरी कमलेश मांगीलाल याने 87.20 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच चौधरी पूजा सखाराम हिने 85.60 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदीप चाबुकस्वार, संजय कुटे, राम शिंदे, वसंत निवगुणें, सचिन आवटे, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल आणि...
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावात रक्तदान शिबीर
पिंपरी चिंचवड, सामाजिक

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावात रक्तदान शिबीर

पिंपरी चिंचवड : राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसनिमित्त थेरगावात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरात 30 युनिट रक्त जमा करण्यात आले. आदित्य बिर्ला रक्तपेढीचे डाॅ. महेश जाधव यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, नयन पुजारी, हरेश तापकीर, सुरेश बारणे, स्विकृत सदस्य संदीप गाडे, विशाल बारणे, पत्रकार मंगेश सोनटक्के, बालाजी पांचाळ, अनिता पांचाळ, गणेश आहेर, प्रदिप दळवी, दत्ता गिरी, रवी महाडीक, विजय काळे, भारती कदम, संजय इंगळे, सागर तुपे, गोरख कोकणे, मच्छिंद्र वाळुंजकर, रवी कुदळे, नरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. संजय गायखे म्हणाले की, "रक्तांची अतिशय तीव्र टंचाई आहे. तरी पण अशा अडचणीच्या काळात आम्ही नेहमी तत्पर असतो. आमची रक्तदानाची लढाई प्रत्येक रुग्णांला रक्...
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

पिंपरी चिंचवड : काळेवाडीतील मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक सत्र 2021-22 करिता प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशसाठी सुविधा केंद्र (FC 6449) कार्यान्वित करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना आता दहावीच्या गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 30 जून 2021 पासून संस्थेत सुरुवात करण्यात आली आहे. पॉलीटेक्नीकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेत कार्यान्वित करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्या गीता जोशी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता केवळ दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. वर्ष 2021 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर सदर विद...
मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

पिंपरी : कोविड १९ महामारीत अत्यावशक सेवेमध्ये आपली सर्वोतपरी जबाबदारी पार पडून सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास कर्तव्यदक्ष राहणारे पोलीस बांधव व वैद्यकिय सेवेतील डॉक्टर यांचा मनसे युवानेते प्रविण माळी आणि अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रावेत पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने यांना तसेच मंगलमुर्ती हॉस्पिटल, स्नेह हेल्थ केअर, पँथलॉजी लँब, अशा अनेक ठिकाणी कोविड योध्दा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी फाऊंडेशनचे सदस्य गणेश माळी, माऊली गव्हाडे, चैतन्य शिंगटे,अनिकेत साळुंखे आदि उपस्थित होते....
बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण

पिंपरी चिंचवड : कोरोना संदर्भातील नियम अनेक नागरिकांकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज शहरात २२७५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच आज १२८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एक लाख ३४ हजार ५४१ एकूण करोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख १६ हजार १७७ रूग्ण कोरोना मुक्त झालेत. शहरातील २८०३ जणांना मृत्यू झाला आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार आज आढळलेली रूग्ण संख्या खालीलप्रमाणे. अ प्रभाग (३१८ बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19 शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, आकुर्डी, गंगानगर, वाहतूकनगरी, उद्योगनगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प ब प्रभाग (३६० बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22 वाल्हेकरवाडी, दळवीनगर...