Tag: Pimpri

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप
पिंपरी चिंचवड

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप

चिंचवड (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या आसपासच्या गरजूंना अन्नधान्य वाटप करावे. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या देशावरती कोरोना विषाणुच्या भयंकर संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामूळे बहुसंख्य लोकांना आपला रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाला, गूळ असे अन्नधान्याचे किट देण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे व मंगेश पाटील यांच्या हस्ते ग...
डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : डिलक्स चौकात रस्ता दुभाजक नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'ग' क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की डिलक्स चौकात काळेवाडी, रहाटणी, पिंपरीगाव येथून पिंपरी आंबेडकर चौक, भाटनगर, मोरवाडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीचा मार्गक्रम आहे. पिंपरी मार्केट जवळच असल्यामुळे येथे कायमच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, डिलक्स सिनेमागृहासमोर रस्ता दुभाजक नसल्याने वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने चालवतात. त्यामुळे कायमच कोंडी होत असते. तसेच येथील अंजली मेडीकल व दवाखान्यासमोर रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचा खांब असून त्याला जोडूनच रस्तादुभाजक कराची चौक...
70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी
पुणे

70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

पुणे-हिंजवडी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. हिंजवडी नजीकच्या माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. दिवसाला सुमारे तीन ते दहा...
काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट

पिंपरी चिंचवड, (लोकमराठी) : काळेवाडी येथे भर रस्त्यात कारने पेट घेतला. काळेवाडीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डी मार्टजवळ आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही नागरिकांनी पाणी टाकुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीनच वाढली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनतर आग आटोक्यात आली. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती....
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, राजकारण

सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा : लोकशाही बचाव समिती

पिंपरी चिंचवड : 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. 2014मध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. मात्र आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. असा सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे, असे आवाहन लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी पिंपरी येथे केले. लोकशाही बचाव समितीच्या वतीने पिंपरीमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी नगरस...
थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
पिंपरी चिंचवड, राजकारण

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्या...