चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’
व्यवसायात सचोटी अन् प्रामाणिकपणा जपा
ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांचे मार्गदर्शन
पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) - कोणताही मोठा व्यवसाय हा एका दिवसात निर्माण होत नाही. व्यवसायाला मोठे करण्यासाठी अपार मेहनत घेवून त्यात सातत्य ठेवावे लागते. व्यावसायिक वाटचालीमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात. अपयशाने खचून न जाता सचोटीने आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. या संघर्षातूनच यशस्वी उद्योजक निर्माण होत असतो, असे मार्गदर्शन चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांनी केले.
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट ही शहरातील नामांकित सेवाभावी संस्था आहे. आरोग्य शिबीर, तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत, विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यासाठी मदत असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. आता ट्रस्टच्या वतीने सचिन येडे, स्वाती राऊत, दिलीप खंदारे, अखिल चिंचवडे यांना अंडाभुर्जीची गाडी उपल...