PUNE : सामाजिक ऐकोपा बिघडवणाऱ्यापासून वारकऱ्यांनी समाजाला सावध करावे – शरद पवार
पुणे (लोकमराठी न्यूज) : सध्या काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय प्रतिकं, महामानव यांच्या विषयी अपशब्द वापरून समाजात असंतोष निर्माण करीत आहेत. अशा प्रवृत्तीपासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
भागवत वारकरी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन रतेचे राज्य निर्माण केले. संतांनी जातीय-धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचेच नाव घेऊन समाजात असंतोष पसरविण्याचे कारस्थानकाही लोक करीत आहेत,असा टोला संभाजी भिडेचे नाव न घेता त्यांनी लगावला. या कारस्थानापासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे. असे आवाहन प...