पुणे : प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. शिक्षक पिढी घडवण्याचे कार्य करतात. शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. आज काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व आले आहे. प्रत्येक शिक्षकाने काळाबरोबर बदलले पाहिजे. आपल्या जीवनात गतिशीलता आणली पाहिजे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करूया, पण त्याचबरोबर सर्व शिक्षकांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस. बी. जगताप यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एस. बी. जडे, आय.क्यू. ए. सी. विभागप्रमुख डॉ. किशोर काकडे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. एस. एम. शितोळे, ग्रंथपाल एस. बी.कोरडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.