पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राज्य सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. मात्र हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन दबाव आणत, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केला.
याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त आयुक्त कृष्णा कृष्ण प्रकाश यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी मला शुक्रवारी (ता. 22) पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्यात गेलो असता त्याठिकाणी आलेल्या सहायक सहायक पोलीस आयुक्ताने माझा मोबाईल काढून घेतला. मोठ्या आवाजात उर्मट भाषेचा वापर करत बोलण्यास सुरूवात केली. तसेच त्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांची बदनामी झालेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तु का आत्मबलिदान करणार आहेस? असा सवाल करत 151/3 ची कारवाई कण्याची भीती घातली अशी माहिती काळे यांनी दिली.
तसेच 28 दिवसासाठी येरवडा जेलला पाठवतो. परत आल्यावर तुला 1 वर्षासाठी जेलला पाठवतो, अशी देखील भीती त्या सहायक पोलीस आयुक्ताने घातली. तसेच ही कारवाई टाळायची असल्यास मी पुढे या विषयावर आंदोलन करणार नसल्याचा जबरदस्तीने व्हिडीओ बनविण्यास सांगितले. तसेच पोलिसांच्या नादाला लागू नको. तुझ्या दुकानासमोर नो पार्किंगचे बोर्ड लावू, तुला एखाद्या गुन्ह्यात अडकवु अशीही धमकी दिली. त्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचा जबरदस्तीने व्हिडिओ बनविल्यानंतर पोलिस स्टेशनमधून रात्री साडेआठ वाजता सोडले.
या सहायक सहायक पोलीस आयुक्ताने माझ्या विरोधात वापरलेली भाषा ही अत्यंत उर्मट व आर्वच्च होती. तसेच त्यांनी कोडुंन ठेवून माझ्यावर दबाव टाकून, धमकावून व्हिडिओ बनवून घेतला. याशिवाय मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच माझे दुकान बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन या संपूर्ण प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्या सहायक पोलीस आयुक्तावर कायदेशीर कारवाई करावी, असे सतीश काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.