दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

पिंपरी : पिंपरी चौकात गेल्या वर्षी मानवता हिताय व कामगार बांधकाम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला 1 वर्ष पुर्ण झाले असून, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ सर्व वृक्षे त्यांना समर्पित करण्यात आली. तसेच फलकाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी श्रीमती आशा जयंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा माधवी जयंत शिंदे, उपाध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दिपक म्हेत्रे, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल कोळी यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ऍड. सुशील मंचरकर, नेते व सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, नितुल पवार, गणेश आहेर, चंद्रकांत बोचकुरे, राहुल विटकर, अजय (बाबा) कांबळे, अजय धोत्रे, अतुल धोत्रे आदी उपस्थित होते.

Actions

Selected media actions