लोकमराठी न्यूज नेटवर्क
काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील काळेवाडी फाटा ते तापकीर चौक, तापकीर नगर या ठिकाणी बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते एम एम शाळेपर्यंतचा मार्ग अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार आहे. या कामाचा भूमीपूजन समारंभ कार्यक्रम तापकीर चौक येथे महापौर उषा माई ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
त्यावेळी उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर, निर्मला कुटे, नीता पाडाळे, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, कैलास बारणे, बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कामाचा सातत्याने पाठपुरावा नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते व चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांनी केला.
या कामांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, सायकल ट्रॅक, समांतर पार्किंग, हॉकर्स झोन, मोटर व्हेईकल लेन इत्यादीचा समावेश आहे. या अर्बन स्ट्रीट डिझाईन असून शहरातील सायकलस्वरांना, शाळेतील विद्यार्थी, वृध्द व्यक्ती यांना उपयोग होईल. अशाप्रमाणे अर्बन स्ट्रीट डिझाईन करण्यात येणार असल्याने काळेवाडी व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.