चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहून, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असा महत्वपूर्ण संदेश दिला. यावेळी युवक युवतींनी मनातील शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, रिलीफ फाउंडेशनच्या भाग्यश्री मुथा, प्राचार्य गौतम भोंग, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी अविनाश कदम, प्रवीण जाविर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन संतोष काशीद तर पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल प्रियांका माळवे यांनी करून दिला.