- मास रेसलिंग क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून मिळवले रौप्य पदक
पिंपरी, दि. 1 फेब्रुवारी 2023 : १० वी ए आय टी डब्ल्यू पी एफ राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघटनेच्या संघाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातून आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ८० किलो वजन गटात बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, आणि पॅनक्रेशन या तिन्ही क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला. त्याने बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशनमध्ये सुवर्णपदक तर मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
दिनांक १९ ते २२ जानेवारी दरम्यान शिर्डी येथील सिल्वर ओक लॉन्स (जिल्हा अहमदनगर) येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा ए आय टी डब्ल्यू पी एफ ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रिएशन फेडरेशनच्या मान्यतेखाली अहमदनगर ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन यांनी आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये भारत भरातून एकूण ३५० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र प्रथम, मणिपूर द्वितीय तर झारखंड तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले.
आदित्य बुक्की आणि नदीम तांबोळी यांना त्यांचे कोच उमरकासीम तांबोळी यांनी मार्गदर्शन केले असून सर्वतोपरी तयारी करून घेतली होती. आदित्यने सातत्याने राष्ट्रीय स्तरावरती मागील तीन वर्षापासून आपल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत.
नदीम तांबोळी याला रौप्य पदक
नदीम महमदअली तांबोळी याने ५९ किलो वजनगटा मध्ये बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग आणि पॅनक्रेशन या तिन्ही क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला आणि मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे.