चाकण, ता. 9 : वाकी खुर्द येथील महेंद्रा ओक्सीटॉप कंपनीच्या मालकावर फसवणूक व भारतीय ट्रेड मार्क अधिनियमानुसार चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
महेंद्र गोरे (पत्ता. गेट नं 124, जाधव वस्ती, पुणे नाशिक हायवे, वाकी खुर्द, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या महेंद्रा इंटरप्रायजेस ही कंपनी महेंद्रा ओक्सीटॉपचे लेबल लावून उत्पादित करत असलेल्या बाटलीवर फिर्यादी यांची माणिकचंद ऑक्सीरिज सारखे लेबल (अक्षरांची साईज फॉन्ट व अक्षरांची ठेवन कलर) त्याचे मिनरल वॉटर बाटलीवर भारतीय ट्रेड मार्क विभागाची कुठलीही परवानगी न घेता लेबल टिकटवत असे. या बाटलीची बाजारात विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक डेरे करत आहेत.