PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद

PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद 

पिंपरी (प्रतिनिधी) - रोटरी क्लब निगडीच्या वतीने एनप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रोटरी एनप्रो आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेतेपद चिंचवड येथील कमलनयन बजाज स्कूलने पटकावले.

बजाज स्कूलचे नववीचे विद्यार्थी आदि कणसे आणि अत्तर एजाज यांनी ३८ गुणांसह प्रभावी कामगिरी केली. स्पर्धक संघ ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे येथील प्रथम ढोकले आणि अथर्व भिडे यांना मागे टाकले. त्यांनी ३२ गुणांसह उपविजेतेपद पटकावले.नवी मुंबई येथील एम्पायरियन स्कूलचे साईश्री पाटील आणि सुदर्शन एम यांनी प्रभावी कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले.

रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, एनप्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थाकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, राकेश सिंघानिया, जयंत येवले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ६५ शाळांचे १०२ संघ सहभागी झाले होते.रोटरी एनप्रो इंटरस्कूल क्विझची दुसरी स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार असल्याची घोषणा आयोजकांनी यावेळी केली.