मराठी साहित्य हे मराठी संस्कृतीचे बलस्थान आहे – राजन लाखे

मराठी साहित्य हे मराठी संस्कृतीचे बलस्थान आहे – राजन लाखे
rajan_lakhe

पिंपरी : मराठी भाषेचे प्राचीनत्व शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ यातून उलगडले आहे. संतांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. लय, भाव, रूप, कल्पना सौंदर्य यामधून संतांच्या ओव्या, अभंग नटले आहे.

“युगे वर झाली युग,

युग झाली अठ्ठावीस,

कुणी म्हणे ना ग बाई,

माझ्या विठ्ठलाला बसं

“मराठीचा हाच काव्यरूप वारसा आजच्या कुसुमाग्रज वि. दा करंदीकर, शांता शेळके, इंद्रजीत भालेराव, दया पवार इत्यादी आधुनिक कवींनी जपला आहे. मराठी साहित्य, मराठी कविता ही मराठी भाषेचे बलस्थान आहेत, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा व मराठी कविता या विषयावर राजन लाखे यांनी आपले विचार मांडले.

मराठी भाषा ही संस्कृत, तेलगू, कन्नड मल्याळी, इंग्रजी आशा या भाषा संस्कृतीच्या सहवासातून समृद्धा झाली आहे तिच्या बोलण्याचा व आचण्याचा लिहिण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला पाहिजे. असे वक्तव्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय मराठी विभागाचे प्रमुख डॉ. संजय मेस्त्री यांनी केले तर आभार प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्या संजीवनी पाटील, मृणालिनी शेखर, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आदी उपस्थित होते.