पिंपरी : भाषा हे संस्कृती वहनाचे साधन आहे. मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. ७ व्या व ८ व्या शतकापासून मराठी भाषेत लोकसाहित्य निर्मिती होत आली आहे. १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यापासून कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, शांता शेळके, बाबुराव बाबूल, दया पवार ते भालचंद्र पर्यंतचे साहित्यिक मराठीत झाले आहे. जगाच्या पाठीवर अधिक बोलली जाणारी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. संत साहित्याने मानवी जीवन चिंतामुक्त करून सुखी बनविण्याचा मार्ग सांगितला महात्मा फुले, महर्षी शिंदे, टिळक, आगरकर, आंबेडकर यांच्या लेखणीने मराठीला आधुनिक विचारांनी समृद्ध केले. ज्ञानेश्वरीतील पसायदानाची UNO ने दाखल घेतली आशा या प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. असे विचार अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाची मांडणी केली होती, त्याचे उद्घाटन प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे म्हणाले की, आजची तरुण पिढी मोबाइल ग्रस्त झाली आहे. त्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल. वाचनामुळे उत्तम चारित्र्य निर्माण होते.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. उत्तम साहित्यकृती व वैचारिक वाड्मय वाचले पाहिजे. यासाठी ग्रंथ प्रदर्शन हा उपयुक्त उपक्रम आहे.
- पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
- महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
- KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
- पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात
- श्री गणेश सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध!
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय मेस्त्री यांनी केले तर आभार प्रा.विद्यासागर वाघेरे यांनी मानले. ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल डॉ. तृप्ती अंब्रे, सहा. ग्रंथपाल श्री. संजय जोशी, सौ. मनीषा जगदाळे यांनी केली. डॉ. राजेंद्र बावले यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्या संजीवनी पाटील, मृणालिनी शेखर, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आदी उपस्थित होते. विद्यार्थी, अध्यापक, ग्रामस्थ, इ. ६४० जणांनी ग्रंथ प्रदर्शन पाहिल्याची नोंद झाली.