- चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांची आयुक्तांकडे मागणी
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : रहाटणी-काळेवाडी मधील (प्रभाग क्रमांक 27) तापकीर नगर, श्रीनगरमध्ये चालू असलेल्या विविध विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या समाजकंटक व स्थानिक गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज हेमंत तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
राज तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले 10 वर्ष रहाटणी काळेवाडीमध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नव्हती. पण 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या तीन वर्षांमध्ये विकास कामांचा धडाका सुरु केला.
मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला असे अनेकदा स्थानिक नागरिकांच्या बोलण्यातून आढळून आले की, प्रभागातील चालू असलेली काही विकास कामे संथ गतीने सुरू आहेत. याबद्दल मी पाठपुरावा केला असता, त्यामध्ये असे जाणवले की, या परिसरामध्ये समाजकंटक दहशत माजवत होणाऱ्या विकासकामात अडथळा आणून लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. व स्वता:च पुन्हा नगरसेवकाच्या नावाने आपणास वारंवार पत्र देऊन आपल्या नगरपालिकेची व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण
- पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
- महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
- KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
- पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात
त्यामुळे जनतेसाठी होत असलेल्या विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणाऱ्या समाजकंटक व गावगुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांना सूचना देण्यात यावी, की निडर होऊन या अशा लोकांच्या धमक्यांना न घाबरता आपली कामे चालू ठेवून लवकरात लवकर ती पूर्ण करण्यात यावीत. असे तापकीर यांनी निवेदनात नमुद केले आहे.