मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हितायने दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश

पिंपरी : मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती आरती करत मानवता हिताय सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक बंधुत्वाचा प्रत्यय खराळवाडी – गांधीनगर येथे आला. मानवता हिताय या संस्थेच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे.

त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, तसलीम शेख, कासीमभाई शेख, अब्दुलभाई शेख, इमरान शेख (गुड्डू), सैफी आलम, मोहम्मद आमीर, नामदेव (आबा) जाधव आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवनिमित्त मानवता हितायने हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला असून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, मानवता हिताय संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग दहा दिवस गरजू, गरीब व दिव्यांगांना धान्यकिट वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे मानवता हिताय संस्थेचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांनी सांगितले.

https://twitter.com/lokmarathi/status/1437849385048559616?s=19