चव्होली बुद्रुक : येथील रहिवासी भोसले परिवाराने पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा व त्यासमोर पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूकीची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तयार केलेला हा देखावा नागरिकांचे आकर्षण ठरला आहे.
भोसले परिवार यांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी भोसले परिवार गणपतीची आरस करताना नवनवीन प्रयोग करत असतो. या वर्षी त्यांनी पुठ्ठ्याच्या सहाय्याने शनिवारवाडा प्रवेशद्वाराची प्रतिकृती तयार केली असून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. या प्रवेशद्वारासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखाव्यात आणखीनच भर टाकत आहे.
प्रियंका अमोल भोसले यांचा हा देखावा आकर्षण ठरत असून देखावा साकारण्यासाठी त्यांचे पती अमोल, सासरे सूर्यकांत वामन भोसले व भाऊजी निसर्ग मित्र विक्रम भोसले यांची मोलाची साथ मिळाली.