पिंपळे सौदागर : महिला कुठेही कमी पडू नये, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वता:सह आपल्या परिवाराची व समाजची प्रगती करावी. हा महिला सबलीकरणाचा उद्देश असलेले उन्नती फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा आशयाचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी येथे केले.
उन्नती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ती’चा गणपती या विशेष गणेशोत्सवानिमित्त महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्याप्रसंगी उपमहापौर हिराबाई नानी घुले, नगरसेविका आरती चौधे, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, आपला आवाज आपली सखी संचालिका संगिता तरडे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नेहा गमे, गौरी कुटे, कविता भिसे, अश्विनी भिसे, मोहिनी मेटे आदी मान्यवरांना गणपती आरतीचा बहुमान देण्यात आला.
त्यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या कि, “उन्नतीचा गणपती महोत्सव ‘ती’ म्हणजे महिलांना उद्देशून हा एक महिला मंडळ म्हणून पिंपळे सौदागरमधील प्रथम मंडळ आहे. मोठ्या उंचीवर पोहचलेल्या महिला वर्गातील महिला पोलीस, महिला डॉक्टर, महिला वकील इत्यादी महिलांना मान देण्यात येतो. तसेच तृतीयपंथी, अंध, विधवा इत्यादी महिलांना समाज मान देत नाही. मात्र, त्याही आपल्या बरोबरीचे नागरिकच आहेत. हाच हेतू ठेऊन त्यांनाही मानसन्मान देत उन्नति फाउंडेशन गेली पाच वर्षे झाली, हा उन्नतीचा गणपती महोत्सव साजरा करत आली आहे.”
विकास काटे, अजिंक्य भिसे, राजेंद्र जयस्वाल, किशोर पुंडे, तुषार काटे, निरंजन भिसे, राज चौंधे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, उपस्थितींचा कुंदा भिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन कुंदा भिसे व उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी केले. आपला आवाज आपली सखी संचालिका संगिता तरडे यांनी आभार प्रदर्शन केले.