पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांना राज्यपालांच्या हस्ते नुकताच ‘महाराष्ट्र कोविड पुरस्कार’ मिळाला. त्यानिमित्त खांडल विप्र बंधू सेवा ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व खांडल विप्र बंधु सेवा ट्रस्टचे सभासदांसह नागरिक उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष बच्छराज शर्मा यांनी साई प्लॅटिनम सोसायटी पिंपळे सौदागर येथे कोरोनो काळात काम केलेल्या व्यक्तीचा सन्मान समारंभाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यावेळी समाजात नागरिकांच्या समस्या जाणुन घेत त्या सोडवुन व कोरोना काळात समाजासाठी बरीच कामे करत एक आदर्श नगरसेवक म्हणुन शत्रुघ्न बापु काटे यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने दिले व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पि. के. स्कूलचे चेअरमन जगन्नाथ अप्पा काटे यांचा देखील कोरोना योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.
त्यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष कुंदा भिसे म्हणाल्या कि, “उन्नती सोशल फाउंडेशन कोरोना काळातच न्हवे, तर समाजाच्या हितासाठी प्रत्येक दिवस कार्यरत असते. येथून पुढेही काही मदत हवी, असेल तर फाउंडेशन आपल्या सेवेत सदैव आहे. जो पुरस्कार मिळाला तो मला एकटीला नाही तर आपल्या पिंपरी चिंचवडला मिळाला आहे. माझ्यासोबत प्रत्येक समाजपयोगी कार्यात पोलीस, डॉक्टर्स, सफाई कामगार व इतर बरेच नागरिक असतील या लोकांनी महत्वाचा हातभार लावला. त्यामुळे मी या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार घेतला.”
खांडल विप्र बंधू सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बच्छराज शर्मा म्हणाले कि, “उन्नती सोशल फाउंडेशन मार्फत कुंदाताई भिसे नेहमी सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यांचे उपक्रम कौतुकास्पद असतात व नुकताच कुंदाताईंना राज्यपालांचे हस्ते महाराष्ट्र कोविड पुरस्कार मिळाला आहे. आपण देखील त्यांचा सन्मान करावा म्हणून मी ट्रस्टच्या व साई प्लॅटिनम सोसायटीमधील नागरिकांचा वतीने सन्मान केला. त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.”
- ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने लावली महापुरुषांच्या प्रतिमेला “आचारसंहीता”
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक