पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त दोघेही संविधानाच्या कलम ५१अ (ग) याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच अवैध वृक्षतोडी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाही न करता तक्रारदारांना व झाडांसाठी न्याय मागणाऱ्या नागरिकांकडेही कानाडोळा करीत आहेत. यासाठी न्याय मागण्यासाठी व महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात पर्यावरण संबंधी संवेदनशीलता यावी, म्हणून एक दिवसीय संवेदना जगाओ सांकेतिक उपोषण वृक्ष मित्रांच्या वतीने संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) करण्यात येणार होते. मात्र, या उपोषणास कोरोना महामारीचे कारण देऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
कलम 51-A (g) जे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे: “जंगल, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहै.
त्याच अनुषंगाने असंवेदनशील पोलिसांची “संविधान दिनाला” होणाऱ्या “संवेदना जगाओ उपोषणाला पिंपरी चिंचवड पोलिसांची परत नोटीस बजावली आहे. कोरोनाचे कारण देत पुनः झाडांचा जीव वाचवा, यासाठी होणाऱ्या शांततेच्या सांकेतिक उपोषणाला परवानगी नाकारत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदर्श ठेवला असून त्याबद्दल कोणत्या शब्दात पोलीस आयुक्तांचे आभार मानावेत. अशी प्रतिक्रिया वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी व्यक्त केली आहे.