ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांचे दैवतीकरण करता त्यांचा जनतेचे राज्य स्थापन करण्यामागचा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा, या हेतूने या पुस्तकाचे वाटप करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, ट्रष्टी गणेश चिंचोले, सल्लागार मंडळ सदस्या वंदना शिंदे, शाहीर स्वप्निल शिरसाट, राजू कोळी, राष्ट्र सेवादलाच्या राज्य पदाधिकारी कल्पना शेंडे, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी व व्हीजेटीयचे इलेक्ट्रिकल डिपारमेंट विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र भोसले, ठाणे जिल्हा पदाधिकारी सुरेखा देशमुख, कवियत्री अनिता देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बदलापूर शाखेचे प्रदीप बर्जे, डोंबिवली शाखेचे उदय देशमुख, संध्या देशमुख, कल्याण शाखेचे गमरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही सर्व पुस्तके गणेश चिंचोले यांनी वाटण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.