समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख

समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - डॉ. विश्वास देशमुख

हडपसर (प्रतिनिधी) : आजच्या काळातही छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. शिवरायांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. रयतेच्या सुखासाठी त्यांनी त्याग केला. शिवरायांचा आदर्श आचरणातून दिसावा, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विश्वास देशमुख यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ,समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे शिवराय होय. त्यागातूनच स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली. हे स्वराज्य रयतेचे आहे. रयतेच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करणारे राजे रयतेचे झाले असे विचार डॉ.विश्वास देशमुख यांनी ओघवत्या शैलीत मांडले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपप्राचार्य प्रा. संजय जडे आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ किशोर काकडे, प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.