अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपकडून ज्येष्ठांचा सन्मान

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपकडून ज्येष्ठांचा सन्मान

पिंपरी, ता १५ : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या संपर्क कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या आकुर्डी संपर्क कार्यालयात आमचे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विठ्ठल रामचंद्र काळभोर, विश्वस्त खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपकडून ज्येष्ठांचा सन्मान

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक वाल्मीक बेंद्रे, माजी सैनिक दस्तगीर बक्षुद्दीन मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते किसन तात्या काळभोर, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब कुराडे, विष्णुपंत गुल्हाने अध्यक्ष जनहित ज्येष्ठ नागरिक संघ, भगवान बडगुजर अध्यक्ष विघ्नहर्ता जेष्ठ नागरी संघ, संपत शिंदे अध्यक्ष शिवशक्ती पतसंस्था, ज्ञानेश्वर ननावरे, प्रकाश परदेशी, अन्सारी काका, मोहन जाधव, चंद्रमणी जावळे, गंगाधर चौधरी, वसंत सोनार, ठोंबरे काका, एकनाथ पाठक, नारायण भोसले, रमेश तराळ, रमेश बनसोड, बबन सुतार, अनिल पाटील आधी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

त्याचप्रमाणे साईनगर, मामुर्डी, येथील आप जनसंपर्क कार्यालयात साईनगर येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रम सोहळ्याला आमचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख संतोषी नायर, दिलीप सुर्यवंशी, वसंत नांगरे, वेंकटेश कोळी, लक्ष्मीकांत कटारे, प्रकाश हगवणे, स्वप्निल जेवळे, एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी साईनगर मधील लहान विद्यार्थी व गायकवाड मॅडम आणि साईनगर मधील रहिवासी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख गोविंद माळी यांनी केले.