एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव
ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व जनसंपर्कासाठी वीणा गावडे यांना जीवनगौरव! मुंबई : एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे, ब्रुसेल्स सदस्य नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशनव गौरव सोहळा २४ डिसेंबर रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व येथे सकाळी साडेदहा ते एक या कालावधीत संपन्न होणार आहे.
या वेळी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत असणार आहेत. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सांस्कृतिक, आरोग्य राज्य मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर असुन पत्रकारांसह, जनसंपर्क तस...