Coronavirus : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती
माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहितीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी राज्यात कमी खर्चात अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट,शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार) अशा गर्दीच्या ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जातोय. ज्यामध्ये दिल्ली, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून हरियाना येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टनेलला फुमिगेशन टन...