मोठी बातमी

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

रायगड : भोर-महाड या रस्त्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रायगड किंवा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या चिटफंड चालकासी मिळते जुळते वर्णन असल्याने नातेवाईक महाडला रवाना झाले असल्याचे कळते आहे. ...
चोरीचा माल खरेदी करणारा निघाला भाजप नगरसेविकेचा पती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

चोरीचा माल खरेदी करणारा निघाला भाजप नगरसेविकेचा पती

पिंपरी चिंचवड : कंपनीमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना महाळुंगे पोलीसांनी १२ तासात अटक केली. विशेष म्हणजे या चोरट्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका भाजप नगरसेविकेच्या पतीदेवाचा समावेश आहे. तो अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.. इम्रान शौकतअली बागवान (वय-19 वर्ष रा. पंचमोहनी ता.इटक जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), इम्रान मुस्तफा हुसेन ( वय-20 वर्ष रा. रमवापुर ता. तुलसीपुर जि.गौंडा उत्तरप्रदेश) आणि रणजित राजेंद्र चव्हाण ( वय-23 वर्ष रा. कंकरापाल, ता. केराकड जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नगरसेविकेचा पती बापु घोलप (यमुनानगर, निगडी) आणि रशीद (भंगारवाला रा. चाकण) अशी फरार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (वय-36 रा. सावरदरी, चाकण) यांनी फिर्याद दिली. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माह...
देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका
महाराष्ट्र, मोठी बातमी

देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका

मुंबई : निवडणुका असलेल्या राज्यांसाठी योजनांची केलेली खैरात पाहिली तर हे देशाचं बजेट आहे की भाजपचं 'इलेक्शन पॅकेज' आहे,अशी शंका येते. नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठीची तरतूद वगळता देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला बजेटमध्ये अक्षरशः पाने पुसण्यात आली. अशी जोरदार टिका कर्जत जामखेड (karjat-jamkhed) मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर लिहिले आहे की, निर्गुंतवणुकीकरणावर दिलेला भर हे काही चांगलं लक्षण नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर वडिलोपार्जित संपत्ती विकून बाजारहाट करण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्याकडं आणि सीमेवर तणाव असतानाही लष्करासाठी भरीव तरतूद करण्याकडं सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पण ते कल्याण कसं करणार याची कोणतीही...
श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी?

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राज्य सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. मात्र हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन दबाव आणत, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केला. याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त आयुक्त कृष्णा कृष्ण प्रकाश यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी मला शुक्रवारी (ता. 22) पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्यात गेलो असता त्याठिकाणी आलेल्या सहायक सहायक पोलीस आयुक्ताने माझा मोबाईल काढून घेतला. मोठ्या आवाजात उर्मट भाषेचा वापर करत बोलण्यास सुरूवात केली. तसेच त्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांची बदनामी झालेली नाही. त्य...
समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे – डॉ. किशोर खिलारे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे – डॉ. किशोर खिलारे

पिंपरी चिंचवड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आकुर्डीगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आकुर्डी आकुर्डी येथील कार्यालयात 'आम्ही भारताचे लोक आणि आमचे प्रजासत्ताक' विषयावर डॉ. किशोर खिलारे (सहयोगी प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,पिंपरी चिंचवड मनपा) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या वतीने डॉ. किशोर खिलारे यांचा कोव्हीड-19 काळातील अतुलनीय आरोग्य सेवेबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच क्रांतिकुमार कडुलकर यांचा ऑनलाइन ऑफिस व्यवस्थापन आणि अविनाश लाटकर, रंजिता लाटकर यांचा ऑफिस नूतनिकरणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर सत्कार यांनी केला.. डॉ. किशोर खिलारे यांनी भारतीय प्रजासत्ताक भारताचा आढावा घेताना सांगितले की, "समाजातील आर्थिक विषम...
जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार
मोठी बातमी, महाराष्ट्र

जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार

यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे. अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील अत्यंत कष्टातून पुढे आलेलं नाव आहे. त्यांचे आईवडील भूमिहीन शेतकरी होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी स्वतः काम करून शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले, एलएलबी पदवी मिळवली आणि पुढे फौजदारी कायद्यामध्ये विशेष अभ्यास केला आणि ते वयाच्या ४३ व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदापर्यंत पोहचले. या पदावर असताना "कांजीलाल प्रेमजीत विरुद्ध क्षेत्रीय वनाधिकारी" खटला असो किंवा "असोसियेटेड बेअरिंग्स विरोधात भारत सरकार" हा खटला असो त्यांचे अन...
पुणे, मोठी बातमी

संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन | विधिवत श्राध्द घालून केला महाराष्ट्र शासनाचा निषेध

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासना विरोधात संताप व्यक्त करत निषेध केला आहे. श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. थेरगाव येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पिंड घालुन, विधी करून श्राद्ध घालण्यात आले. तसेच या बाबत निर्णय न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. या श्राद्ध आंदोलना वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी, महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अपमान कारक आक्षेपार्य लिखाण केले. तस...
एमएमआरडीए प्राधिकरणामध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांची द्वार सभा
महाराष्ट्र, मोठी बातमी

एमएमआरडीए प्राधिकरणामध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांची द्वार सभा

"प्राधिकरण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…बाहेरचे हटाव, प्राधिकरण बचाव…" घोषणांनी दणाणला परिसर मुंबई : एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरणामध्ये द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीने प्रचंड गाजले. मागील तीन वर्षांपासून आयुक्त आर. ए. राजीव यांनी एकदाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबधी संघटनेला चर्चेला वेळ दिला नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.काही दिवसांपूर्वी द्वार सभेची संघटनेने नोटीस देऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही,याबद्दलचा राग सर्वांच्या मनामध्ये धगधगत होता, हे आजच्या प्रसंगी दिसून आले. प्राधिकरणाची ढासळती अर्थव्यवस्था याबद्दल सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी सुरक्षा योजना व सेवनिवृत्तीं नंतर वैद्यकिय सुविधा या योजना राबविण्...
मोठी बातमी, राष्ट्रीय

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त वक्तव्य | म्हणाल्या शुद्राला शुद्र म्हटलं तर…

एएनआय : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. साध्‍वी प्रज्ञा यांनी मध्‍य प्रदेश मधील सीहोर येथे एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निशाणा साधताना त्यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला. प्रज्ञा म्हणाल्या की, ‘क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट वाटत नाही. ब्राह्मणला ब्राह्मण म्हटलं तर वाईट वाटत नाही. वैश्‍याला वैश्‍य म्हटलं तर वाईट वाटत नाही. मात्र, शुद्राला शुद्र म्हटलं तर वाईट वाटत. कारण काय आहे? हे समजत नाही. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला आहे. https://twitter.com/ANI/status/1337878315873366016?s=19 याबरोबरच त्यांनी बीजेपी अध्‍यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांचावर निशाना साधताना म्हटले की, ‘...