नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह निरिक्षकांच्या लाचखोर टोळीवर एसीबीची कारवाई
सातारा : कचरा उचलण्याऱ्या ठेकेदाराची डिपोझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यासह तीन निरिक्षकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने (एसीबीने) सोमवारी (ता. 8) कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ, वर्ग -२ (वय 33 वर्ष, सातारा नगरपरिषद रा. फोर्ट व्हिव्ह बी १3, १०० केसरकर पेठ सातारा, मूळ रा. रिया बी रायकरनगर धायरी, पुणे-४१), प्रविण एकनाथ यादव (वय ५१ वर्ष, आरोग्य निरीक्षक, रा . ३२२ धादमे कॉलनी, करंजे पेठ सातारा), गणेश दत्तात्रय टोपे (वय ४3 वर्ष, स्वच्छता निरीक्षक , रा .१२८ यादोगोपाळ पेठ सातारा), राजेंद्र कार्यगुडे (आरोग्य निरीक्षक रा .१७२ / २ एसटी कॉलनीचे पाठीमागे सातारा) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीने दिलेल्...