गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्कपिंपरी, (दि. २६) : पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला.
देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश कऱणार आह...