सिटिझन जर्नालिस्ट

संविधान दिनाच्या दिवशी हा फोटो बघा..
सिटिझन जर्नालिस्ट

संविधान दिनाच्या दिवशी हा फोटो बघा..

हेरंब कुलकर्णी आज संविधान दिन. भारतीय संविधानात लोक सर्वोच्च स्थानी आहेत असे मानणारा हा दिवस. पण हा फोटो भारतीय लोकशाही दिनी सर्वोच्च स्थानी कोण आहे? हे सांगायला पुरेसा आहे. सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या आंदोलनात कार्यकर्ते जेव्हा निवेदन देतात तेव्हा ते निवेदन स्वीकारताना अधिकारी उभे सुद्धा राहत नाहीत हेच चित्र असते. उभे राहून सामाजिक कार्यकर्त्यांनी विषयी आदर व्यक्त करावा असे त्यांना वाटत नाही. वास्तविक या फोटोत निवेदन देणारे कालिदास आपेट हे एका शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत व त्यांच्यासोबत काम करणारे शेतकरी किमान 30 वर्षापेक्षा जास्त काळ रस्त्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आहेत. समाजासाठी काम करणारी ही माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून तुमच्या कार्यालयात येतात स्वतःसाठी काही न मागता जनतेच्या प्रश्नावर तुमच्याशी बोलतात तेव्हा ते निवेदन स्वीकारताना उभे राहून कि...
सापाची अन्नसाखळीत खुपच महत्त्वाची भूमिका
सिटिझन जर्नालिस्ट

सापाची अन्नसाखळीत खुपच महत्त्वाची भूमिका

गणेश भुतकर साप म्हणले की माणूस त्या सापाकडे न बघता सुद्धा अतिशय घाबरतो ही माणसाची स्वाभाविक क्रिया आहे. सापांची भीती माणसाला कोणीही घातलेली नसुन ती आपल्या रक्तात आहे. पण साप खरोखरच इतके खतरनाक, भयावह, भीतीदायक किंवा उपद्रवी आहेत का❓ चला एक छोटासा आढावा घेऊन बघुया. भारतात सुमारे ३५०+ सापांचे प्रकार आढळतात. त्यातील फक्त ५ ते ६ सापच विषारी असतात ज्यांच्या चावण्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्या प्रमुख विषारी सापांना भारतात Big Four म्हणून ओळखले जाते. त्यांची नावे नाग, फुरसे, घोणस आणि मन्यार पैकी आपल्या इथे फुरसे हा साप आढळत नाही. तसेच घोणस आता फक्त नदीच्या कडेला सापडतात. मन्यार फक्त रात्री बाहेर पडून सूर्योदयापूर्वी परत बिळात किंवा अडचणीत निघून जातो. राहता राहिला प्रश्न फक्त नागाचा तर नाग आपल्या वाकड, पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, हिंजवडी थोडक्यात सर्वत्र आहेत. तसेच बिनविष...
कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी
सिटिझन जर्नालिस्ट

कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी

अपर्णा कुलकर्णी सध्याच्या आजाराच्या घटनेने आपल्याला कळले आहे की, एकता, आपल्याला परिस्थितीशी लढाई करण्यास मदत करते. या रोगाचा सर्वत्र परिणाम झाला आहे. लिंग, वय, धर्म, राष्ट्रीयत्व आणि वंशिकता याची पर्वा न करता सर्वत्र याचे पडसाद उमटले आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक देखील आहेत. यामुळे घरून कार्य करणारी एक नवीन अर्थ व्यवस्था सुरू झाली आहे. आरोग्य आणि स्वच्छता ही नागरीक तसेच राष्ट्राची प्राथमिकता बनली आहे. या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना आपण करत आहोत. त्याचबरोबर यातून नवनवीन संधी देखील निर्माण होताना दिसत आहेत. करोनाची (Corona) लाट आल्यावर जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली, तशी आपल्याला विविध गोष्टींची कमतरता भासू लागली. अनेक वैद्यकीय आव्हानांचा आपण सामना केला किंबहुना अजूनही करत आहोत. यामध्ये सगळ्यात जास्त कमतरता जाणवली ती रूग्णखाटांची. प्राम...
संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!
सिटिझन जर्नालिस्ट

संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!

डॉ. किरण मोहिते नातवंड म्हणजे दुधाची साय. पोटाच्या गोळ्या पेक्षाही नातवावर प्रेम, आपुलकी, माया असणारे. त्या माया पोटे ताड ताड बोलणारे देखील असे माझे आजोबा गावावरून पुण्यात यायचे. सातारा वरून पुण्यात येताना थेट रेल्वेने प्रवास करून चक्क देहु रोड पर्यंत लोकलने एकटे प्रवास करायचे. मंदिरात जाण येणं चालू असेयाचं. किर्तन, भजन, तोंड पाठ, पेटी घेयाचे अन भजन गात बसेयचे. वय साधारण पणे ८६ वर्ष. या वयात तरुणांना देखील लाजवेल असं चालणं, बोलण, स्मरणशक्ती, एका डोळ्याने अंधुकसं दिसायचं एवढंच. मी म्हटलो दादा एखाद भजन म्हणा मी डायरीत लिहून ठेवतो. त्यांनी स्वयं लिखित तयार केललं कडव... संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची ( 1 ) कुण्या दुर्बलता नको जोर दाउ ...
घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस
सिटिझन जर्नालिस्ट

घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथे राहणाऱ्या संजय जाधव या तरूणाने कागदी कपापासून गणपतीची आरस केली आहे. पर्यावरणपूरक केलेली ही सजावट नागरिकांचे आकर्षण ठरली आहे. रंगीत विद्युत दिव्यांची भोवताली रोषणाई केली असून समोर प्लास्टिकची फुले व गणपतीच्या मागे पुठ्ठ्यावर पांढऱ्या रंगाचा मऊ कपडा लावला आहे. त्यामुळे आजूनच शोभा वाढली आहे. https://youtu.be/dZiZ6K1Sllg सुमारे ४०० कागदी कपांचा वापर यासाठी केला असून दरवर्षी नवनवीन प्रयोग करत संजय देखावा साकारत असतो. ही सजावट करण्यासाठी पत्नी रोहिनी, मुलगा अरविंद व मुलगी आरोहि या चिमुरड्यांनीही मदत केली. असे संजयने आवर्जून सांगितले. मागील सहा वर्षांपासून संजय गणपती प्रतिष्ठापना करतो. संजयचा (मो. नं. ९८८१७८३४५८, ७०४०२६९६९०) श्रीशांत पुणेरी ढोल पथकाचा व्यवसाय आहे....
सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक
सिटिझन जर्नालिस्ट

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक

विमल मैत्र, चिंचवड बेकायदा पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही नुकतीच ठाण्यात घडलेली घटना संतापजनक आहे. या हल्यात कल्पिता यांचे दोन बोटे कापली गेली. या महाराष्ट्रात आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रू शायिस्तेखानाची बोटे कापल्याचे ऐकत आलो आहोत. आज त्याच महाराष्ट्रात आपल्याला हि बातमी ऐकावी लागते, हे दुर्देवी आहे. अशाप्रकारच्या घटना परत घडू नये, म्हणून शासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी, हि अपेक्षा आहे. ...
रक्षाबंधन….असेही!
सिटिझन जर्नालिस्ट

रक्षाबंधन….असेही!

संतोष गोलांडे पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिराचे काम सुरु आहे. काही महिन्यांपासून या कामावरील कामगार हे काम करीत आहेत. अनेक दिवस घरापासून दूर आलेले आहेत. घरापासून दूर आल्यामुळे सर्व सण समारंभाना ते मुकलेले आहेत. आज श्रावणी पौर्णिमा..रक्षाबंधन चा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा विशेष दिवस. आमचे मित्र प्राध्यापक श्री. विद्यासागर अप्पासाहेब वाघेरे हे रोज नवीन मंदिराच्या कामावर भेट देऊन पाहणी करीत असतात. परंतु आज ते त्यांची कन्या कु. चित्कला हिला घेऊन मंदिराच्या कामाच्या ठिकाणी गेले. कु. चित्कला हिने मंदिराच्या कामावरील सर्व कामगारांना ओवाळले. नाथसाहेबांच्या मंदिरासाठी झटणाऱ्या हातांवार राखी बांधली. प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी स्वतः सर्व कामगारांना मिठाई देऊन तोंडं गोड केले. या सर्व प्रसंगाने भारावलेल्या श्रमिकांच्या डोळ्यात अश्रू न आले तर नवलंच! भरलेल्या डोळ्यांनी...
धार्मिक कट्टरवादी समुदाय नेहरूंचा द्वेष का करतो ?
सिटिझन जर्नालिस्ट

धार्मिक कट्टरवादी समुदाय नेहरूंचा द्वेष का करतो ?

आनंद शितोळे लोकही नेहरूंना दोष देताना नेहरू भाबडे होते, साम्यवादी होते कि समाजवादी होते कि अजून काही होते याच्या चर्चा करतात, चरित्रहनन करताना खोटे फोटो, कहाण्या, नेहरूंच मुस्लीम मूळ आणि कुळ याबद्दल अफवा पसरवल्या जातात. यापलीकडे जाऊनही नेहरूंच महत्व नाकारता येत नाही म्हणून ७० वर्षांनी सुद्धा टीका करायला नेहरुच लागतात आणि खापर फोडायला नेहरुच लागतात , हे नेमक का ? १९४७ साली पाकिस्तान-भारत दोन्ही देशांचा जन्म झाला.मोहम्मद अली जीनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची वाटचाल सुरु झाली. ह्या ७० वर्षात पाकिस्तान अधिकृतरीत्या इस्लामिक देश बनलेलं आहे. ह्या ७० वर्षात अनेकदा देशाची राज्यघटना पूर्णपणे बदलण्यात आली. ह्या ७० वर्षात देशाचे दोन तुकडे झाले. ह्या ७० वर्षात तब्बल ३९ वर्षे थेट लष्करी हुकुमशहा सत्तेवर होते आणि उरलेल्या काळात सरकार नावाच लष्कराच्या तालावर नाचणार बाहूल. ह्या ७० वर्षात ईशन...
हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच…
सिटिझन जर्नालिस्ट, मोठी बातमी

हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच…

जयंत जाधव फटाके फोडणे म्हणजे विध्वंसातून आनंद घेणे. एखादी वस्तू जळाल्याने, त्यातून धूर आल्याने किंवा त्यातून मोठा आवाज आल्याने ज्यांना आनंद मिळतो त्यांची वृत्ती ही विध्वंसक असते किंवा विध्वंसक बनत चाललेली असते. लहान मुलांना आपण फटाके फोडायला शिकवून कोणते संस्कार करतोय हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. माननीय राष्ट्रीय हरित न्यायालयाने व यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निकाल देताना जी निरीक्षणे, आरोग्य सर्वे व तज्ञ मते नोंदवली आहेत ती गंभीर आहेत. वास्तविक कोरोनाच्या पर्शवभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आपल्या सांगली सारख्या शहराचा देशातील अति प्रदूषित १२२ शहरांमध्ये समावेश होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि नोंदविलेल्या निरीक्षणांमध्ये दिवाळीत सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद आहे. त्यानंतर ख्रिसमस, ३१ डिसेंबर व इतर सण, कार्यक्रमांचा उल्लेख आहे. मुळात दिवाळी हा सण प्रेमाचे, शांतत...
भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे
सिटिझन जर्नालिस्ट

भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे

मनुष्य हा पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिजीवी प्राणी आहे हे आपण जाणतोच. मनुष्याला विचार, तर्क आणि दृष्टिकोन असण्याची कला नैसर्गिकरित्या अवगत आहे परंतु अजूनही माणूस हा विविध अंधश्रदेच्या विळख्यात अडकलेला दिसून येतो. आजही समाजात अंगात येणे, पिंडाला कावळा शिवणे, भूत पिशाच्च, करणी, वशीकरण, जादू टोना, काळी जादू अश्या अनेक घटकांना बळी पडण्याचे प्रमाण दिसून येते, अगदी सुशिक्षित समाजात देखील ह्या गोष्टी घडतात ही एक शोकांतिका आहे. जीवनात कुठल्याही गोष्टीवर नितांत डोळस श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा ही भीती पोटी ब्राम्हराक्षस असते हे समजून घ्यायला हवे. यामध्ये प्रत्येक घटक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि होणाऱ्या घटनांची कारणीमीमांसा करणे आणि योग्य ते उत्तर शोधणे म्हणजेच तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास होय. सकारात्मक विचार जीवनाचे अनेक पैलू उलगडून देतात आणि विवेकी बनवतात, सद्यस्थितीत आपल्...