PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
पिंपरी :- मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे खरे कारण बाहेर येऊ नये, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पतीने स्वतःच मृत पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिल्याची घटना २५ फेब्रुवारीला पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली.
हिमांशू दिनेश जैन (३५, रा. सौदागर) या संगणक अभियंता पतीवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता असून आत्महत्या केलेली विवाहिता गृहिणी होती. हिमांशू याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यावरून पती-पत्नीत सतत वाद होत होते. दरम्यान, त्यांच्या एक वर्षीच्या मुलीचे २७ फेब्रुवारी २०२४ रो...










