ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश | गुन्हे शाखा युनीट चार पथकाची कामगिरी
पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रेकी करून ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट-4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळक्याकडुन सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एकुण 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश विष्णु शाही (वय-33 वर्ष मुळगाव- भुरुआ, लम्की टिकापूर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय- 27 वर्ष, मुळगाव - घाटगाऊ, चौगुने गाव पालिका, जि. सुरखेत, नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय- 42 वर्ष मुळगाव- कालेकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छाम, नेपाळ, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रीज जवळ, पुनावळे), रईस कादर खान ( वय - 52 वर्ष रा. तीन डोंगरी प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र. 2, साईबाबा मंदिर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई, जगत बम शाही ( वय- 28 वर्ष, सध्या रा. क्रिस्टल पॅलेस, कृष्णा कॉलनी, मारुंजी, पुणे, मुळगाव-गैटाडा, विनायक नगरपालिका, जि...