शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे
शैक्षणिक

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे

हडपसर (प्रतिनिधी) : मराठी भाषेला लोकसंस्कृती व लोक व्यवहाराचे कवच आहे, तोपर्यंत कोणताही धोका नाही. मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे. ती लोक व्यवहाराबरोबर साहित्य व्यवहारातही असावी. कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्व प्रतिभासंपन्न होते. त्यांच्या साहित्यातील वैचारिकता समाजाला दिशा देणारी आहे. भाषा हा मानवी जगण्याचा श्वास आहे. त्यामुळेच आपल्या जीवनात गतिमानता आली आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, ही धोक्याची सूचना आहे. इतर भाषा शिकूया पण आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. लेखकांनी लेखन करून मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपणही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करुया, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन समारंभ प्रसंगी प्...
समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख
पुणे, शैक्षणिक

समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख

हडपसर (प्रतिनिधी) : आजच्या काळातही छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. शिवरायांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. रयतेच्या सुखासाठी त्यांनी त्याग केला. शिवरायांचा आदर्श आचरणातून दिसावा, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विश्वास देशमुख यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ,समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे शिवराय होय. त्यागातूनच स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली. हे स्वराज्य रयतेचे आहे. रयतेच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करणारे राजे रयतेचे झाले असे विचार डॉ.विश्वास देशमुख यांनी ओघवत्या शैलीत मांडले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपप्राचार्य प्रा. संजय जडे आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ किशोर काकडे...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ उपक्रम संपन्‍न
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ उपक्रम संपन्‍न

हडपसर (प्रतिनिधी) : विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' या उपक्रमांतर्गत दोन व्याख्यानांचे व एक दिवसीय कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखा हडपसरच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे उपस्थित होत्या. त्यांनी 'महिला संरक्षण, कायदे व नियम' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कायद्याने आपल्याला संरक्षण दिले आहे. त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. नवीन गोष्टी शिकत राहा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. अशा स्वरूपाचा संदेश पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी दिला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, येथील कॉमर्स विभागातील प्रा. असावरी शेवाळे मॅडम यांनी 'व्यावसायिक उद्यो...
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
शैक्षणिक

श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

पिंपरी : शिवजयंती निमित्त शिवरायांच्या मूर्तीचे व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पोवाडे व मनोगते सादर केली. त्याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका, मनीषा जैन, पर्यवेक्षक सुभाष देवकाते, विभाग प्रमुख संतोष शिरसाट, शिक्षक प्रतिनिधी सोनवणे स्मिता, सावळे एस. एस. यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी यथार्थ मिस्तरी, खैरे प्रतीक, विनित गाढवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा तसेच दर्शन कदम, रितेश लटपटे व ओंकार गायकवाड या विद्यार्थ्यांनी जिजाऊंची वेशभूषा अप्रतिम केली होती. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका जैन मनीषा यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवरायांची महती स्पष्ट केली. आव्हाड श्रीधर यांनी आपल्या मनोगतात शिवरायांची दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेची राजांना अस...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर परिसंवाद
शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर परिसंवाद

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमध्ये १७ फेब्रुवारी रोजी, अर्थशास्त्र विभाग आणि ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सरकारी खर्च आणि उत्पन्न याबाबतच्या तरतुदी वर चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुणे आणि साधन व्यक्ती यांची ओळख करून दिली. ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरमचे संचालक डॉक्टर रतिकांत रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची मुख्य कल्पना डॉक्टर रतिकांत रे यांनी मांडली. डॉक्टर विजय ककडे यांनी अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीवर भाष्य केले.&n...
मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांना सावित्री ते जिजाऊ गौरव पुरस्कार
शैक्षणिक

मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांना सावित्री ते जिजाऊ गौरव पुरस्कार

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांना माळी महासंघ व माध्यमिक शिक्षक संघ पिपंरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री-जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (ता. २०) हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य शोभा देवकाते या मागील २५ वर्ष निःस्वार्थ भावनेने करत आहेत. अहोरात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास, त्यांना सुजान अन सुसंस्कृत नागरिक बनविण्याचे स्वप्न त्यांनी पहिले व ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केले. आज त्यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांना घडवीत आहे. त्यांच्याकडे असलेला स्पष्टवक्तेपणा प्रसंगी रागावून दुसऱ्याच क्षणी पाठीवर हात ठेवून विद्यार्थ्यांला त्याची चूक दाखविण्याच्या...
अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
शैक्षणिक

अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

निगडी : प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेच्या आवारात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीने शिवगर्जना सादर केली. त्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न होऊन विद्यार्थ्यामध्ये जोश निर्माण झाला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून महाराजांचे प्रेरणादायी बोल सादर केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची वेशभूषा केली होती. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा पोवाडा ‌आपल्या कणखर आवाजात सादर केला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीने शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगण...
प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान
पुणे, शैक्षणिक

प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन भानुदास भागवत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ.अर्जुन भागवत यांचा संशोधनाचा विषय "शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या कल्पक प्रकल्पांचे व्यवस्थापन : एक तुलनात्मक अभ्यास " हा होता. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधील अकाउंटन्सी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर सानप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यु .ए. सी प्रमुख प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन ...
प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान
यशोगाथा, शैक्षणिक

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान

हडपसर : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ची पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ''अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई'' या विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले....
महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित
शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित

महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्था, सातारा च्या सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते. त्याप्रसंगी डॉ. प्रतिभा गायकवाड म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या अंतर्गत कलागुणांचा विकास करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय ही क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच अवांतर साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करतात, त्याद्वारेच विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते, यातून विद्यार्थ्यांमधील भावी लेखक, साहित्यिक घडत जातात.” यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “महाविद...