शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

अभिमान स्कूलमध्ये मकरसंक्रांत ऑनलाईन साजरा
शैक्षणिक

अभिमान स्कूलमध्ये मकरसंक्रांत ऑनलाईन साजरा

निगडी : प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये मकरसंक्रांत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पतंगाच्या आकाराचे सुंदर भेटकार्ड बनवले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी तिळगुळाचे दागिने (हलव्याचे दागिने) बनविले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर ‌पतंग तयार करून त्यावर सामाजिक संदेश लिहीला. सर्व विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत का‌? व केव्हा? साजरी केला जाते, या विषयाची माहिती शिक्षकांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी मार्गदर्शन केले....
समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे
पुणे, शैक्षणिक

समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे

हडपसर (प्रतिनिधी) : पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता सुरू केली. समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी. मुखवटे धारण करणारी पत्रकारिता नसावी. समताभाव निर्माण करणारा विचार वर्तमानपत्रातून व्यक्त झाला पाहिजे. असे विचार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी व्यक्त केले. हडपसर येथील एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग व मास कमुनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे बोलत होते. ते म्हणाले की, "लोकशाही संस्कृतीला पोषक जबाबदार नागरिक तयार करण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या...
एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. आज सर्व क्षेत्रात मुलींनी आपले श्रेष्ठत्व दाखवले आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही शिक्षणावर मोजली जाते. फुले दांपत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानामुळेच आज महिला वर्ग शिकत आहे. समाज सुधारणेचे कार्य शिक्षणामुळे होऊ शकते. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील सावित्रीबाई फुले जयंती समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील मानसशास्त्र विभागाच्या डॉ.योगिता खेडकर यांनी "स्त्री-पुरुष समानता" या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मानाचे, समतेचे स्थान मिळायला पाहिजे. आज स्त्रियांना समान संध...
“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पिंपरी : “शेतकरी, कामगार, देवदासी, अस्पृश्य समाज यांच्या उद्धारासाठी निस्पृह वृत्तीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यामधील दुवा म्हणजे वि. रा. शिंदे यांचे कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर निस्पृह वृत्तीने काम केले. ते खऱ्या अर्थाने महर्षी या पदवीला पात्र होते. त्यांच्या उपेक्षित कार्याला समाजापुढे आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले...
अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शैक्षणिक

अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पिंपरी : निगडी प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये सोमवारी (ता. ३ जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच 'बालिका दिवस' साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, सामाजिक कार्य तसेच शिक्षणाचे महत्त्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या भाषणातून दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिली महिला शिक्षिका आहेत तसेच समाजसेविका सुद्धा आहेत. समाजातील मुलींचे स्थान अधिक चांगले होण्यासाठी व सामाजिक भेदभाव कमी होण्यासाठी त्याचीच आठवण व स्मरण होण्यासाठी आजचा दिवस 'बालिका दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमास वालचंद संचेती यांचे सहकार्य लाभले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांच्याकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले....
एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा
शैक्षणिक

एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा

हडपसर : एस.एम.जोशी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातील विध्यार्थ्याकडून शिक्षक कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन तसेच यासारखे इतर दिवस साजरे करता आले नाहीत. कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शिक्षक अविरतपणे ऑनलाईन पद्धतीने तसेच प्रसंगी ऑफलाईन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एस. एम. जोशी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतज्ञता दिन साजरा केला. या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अर्थशास्त्र विभा...
निगडीतील अभिमान स्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा
शैक्षणिक

निगडीतील अभिमान स्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

पिंपरी : निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये गणित दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लयबध्द पाढे म्हटले. इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी भूमितीय आकाराचे थ्रीडी मॉडेल्स बनवून त्यांची माहिती दिली. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सोप्या पद्धतीने गणिताची उदाहरणे लवकरात लवकर कसे सोडवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आजच्या कार्यक्रमास वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी मार्गदर्शन केले....
अभिमान प्रायमरीमध्ये शेतकरी दिवस साजरा
शैक्षणिक

अभिमान प्रायमरीमध्ये शेतकरी दिवस साजरा

पिंपरी : निगडी प्राधिकरणमधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. यासाठी इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा धारण करून शेतकऱ्यांचे घोषवाक्य सादर केले. इयत्ता तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी शेती अवजारांचा उपयोग विद्यार्थ्यांना सांगितला. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुबक पद्धतीने बैलगाडी व ट्रॅक्टर कागद व पुठ्ठ्याचा वापर करून बनवले होते. प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे उपक्रम प्रदर्शनांमध्ये सादर करण्यात आले होते. ट्रॅक्टर, बैलगाडी यांचे प्रदर्शनांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले....
अभिमान प्रायमरीमध्ये नाताळ सणाचा उत्साह
शैक्षणिक

अभिमान प्रायमरीमध्ये नाताळ सणाचा उत्साह

पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजचा मुखवटा, इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीकॅरल सॉन्ग तसेच इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी जिंगल बेल आकर्षक पद्धतीने बनवले होते. मुलांमध्ये यावेळी खूप मोठा उत्साह व आनंद दिसून आला. शाळेमध्ये खूप सुंदर क्रीब बनवण्यात आले होते. यामध्ये प्रभू येशू जन्माचा देखावा दाखवण्यात आला. नाताळ गीता बरोबरच सांताक्लॉज मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांमध्ये रमून गेला होता. यावेळी शाळा जिंगल बेल या गाण्याने दुमदुमून गेली. कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सह...
मानसशास्त्र विभागाची अनाथ आश्रमाला भेट
शैक्षणिक

मानसशास्त्र विभागाची अनाथ आश्रमाला भेट

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी बचपन बचाव समिती, घरटं अनाथ आश्रमाला भेट दिली. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांशी संवाद करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अनाथ मुलांच्या आयुष्यामध्ये काही क्षण आनंदाचे देण्याच्या हेतूने या संस्थेला भेट दिली. या सामाजिक संस्थेविषयी माहीती जाणून घेतली. अनाथ मुलांची दिनचर्या जाणून घेऊन, त्यांच्याशी मनमोकळा संवाद केला. या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात आले. सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. तसेच या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाने 'बचपन बचाव समिती, घरटं अनाथ आश्रमाला' भेट देण्यात आली. यावेळी घरटं अनाथ आश्रमाचे अध्यक्ष, व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मानसशास्त्र विभागप्रमु...