शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र
शैक्षणिक

एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र

पिंपरी चिंचवड : येथील एम.एम तंत्रनिकेतनच्या संगणक विभागातील सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र देण्यात आले. बाह्यपरीक्षका समोर ३८ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील सात प्रकल्प कॉपी राईट प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आली, त्यातील सहा प्रकल्पाना प्रमाणपत्रे मिळाले असून एक प्रकल्प मंजूर झाला असून प्रमाणपत्र यायचे बाकी आहे अशी माहिती संगणक विभागाचे प्रमुख विकास सोळंके यांनी दिली. नाविन्यपूर्ण संशोधनाचा ध्यास घेतलेल्या एम.एम तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक प्रकल्प निवडताना दररोज भेसवणाऱ्या अडचणींना तंत्रज्ञनाच्या माध्यमातून कश्या सोडवता येतील या वर भर दिला जातो. अश्या सर्व प्रकल्पना संशोधकीय नियतकालिकात प्रकाशित केले जाते. मागील वर्षी ३२ प्रकल्प नियतकालिकात प्रकाशित झाले यात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञनाचा योग्य वापर...
एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘बालदिन’ साजरा
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘बालदिन’ साजरा

हडपसर - १४ नोव्हेंबर; प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बालदिन' म्हणून सांस्कृतिक विभागामार्फत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे साहेब उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंडित पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाचे आदर्श नागरिक होतील. अशा विचाराने पंडि...
जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी
पुणे, शैक्षणिक

जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी

हडपसर - १२ नोव्हेंबर, प्रतिनिधी- डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते श्रीधर महादेव जोशी उर्फ एस. एम. जोशी यांची जयंती सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, एस. एम. जोशी हे थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते होते. आपल्या प्रामाणिक आणि सात्विक व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या काळातील अनेकांना सामाजिक कामाची प्रेरणा दिली. विद्यार्थी दशेत असताना ते महात्मा गांधी यांच्या चळवळीने प्रभावित झाले. काही विशिष्ट ध्येय, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. पुढे ते कामगार पुढारी 'एसेम' या नावाने लोकांमध्ये परिचित झाले. १ ९ ४...
डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
शैक्षणिक, ताज्या घडामोडी

डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. ई. एस. एन. पब्लिकेशन्स, प्रशांत हॉस्पिटल, विजयवाडा, अध्यापना आणि लर्न विथ लॉजिक या तामिळनाडू येथील संस्थांनी डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. डॉ. तुषार निकाळजे डॉ.तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ सहाय्यक ( क्लार्क) पदावर गेली तीस वर्षे काम करीत आहेत. त्यांनी कार्यालयीन काम करीत असतानाच एम. फिल .पीएच.डी. (राज्यशास्त्र) शिक्षण पूर्ण केले. डॉ.निकाळजे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दहा पुस्तके लिहून प्रकाशित केली.त्यामधील "भारतीय निवडणूक प्रणाली, स्थित्यंतरे व आव्हाने" हे पुस्तक तीन विद्यापीठांच्या बी .ए , एम ए. (राज्यशास्त्र) विषयाच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून निवड झालेले आहे. एका राष्ट्रीय व एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विद्यापीठ अनुद...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये “मिशन युवा स्वास्थ्य कोविड-१९ मोफत लसीकरण अभियान” संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये “मिशन युवा स्वास्थ्य कोविड-१९ मोफत लसीकरण अभियान” संपन्न

हडपसर (प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे) : प्रत्येकाने वेळेवर लस घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतरही काळजी घ्या. यापुढे आपणास covid-19 बरोबर आयुष्य जगावे लागणार आहे. जगातील काही देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. आपणही दिवाळीचा आनंद घेताना पथ्ये पाळायला पाहिजेत. गर्दी न करता दिवाळी सणाचा आनंद घ्यायला पाहिजे. फटाके विरहीत दिवाळी साजरी करावी. प्रदूषणमुक्त दिवाळीचा उत्सव साजरा करून आनंदी जीवन जगावे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख व आमदार चेतनदादा तुपे साहेब यांनी मांडले. ते एस .एम. जोशी कॉलेजमध्ये बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन. सी. सी.विभाग, हेल्थ केअर सेंटर व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन युवा स्वास्थ्य covid-19 मोफत लसीकरण अभियानाच्या" उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

हडपसर, (प्रतिनिधी) : ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांशी आपली चर्चा होते. ऊर्जा व त्याचे जतन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरनाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. ऊर्जेचे संवर्धन झाले पाहिजे. ती काळाची गरज आहे. असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स व आय. क्यू.ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण कोरियाचे डॉ. यंग पाक ली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरतचे डॉ. निशाद ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

हडपसर (प्रतिनिधी : डॉ. अतुल चौरे) : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. एस. एम. जोशी महाविद्यालयातील मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागामार्फत 'वाचन प्रेरणा दिनाचे' औचित्य साधून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी घरी एक तास वाचन करण्याचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासली जाईल. तसेच नवीन येणाऱ्या पिढीसमोर वाचनाचा आदर्श निर्माण होईल. अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केली. या उपक्रमात महाविद्यालयातील शुभम शेंडे, मानसी गिरम, मुसैब शेख, जय दुधाळ, निलेश सोनावणे, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. संदीप वाकडे, डॉ. नम्रता मेस्त्री याबरोबरच महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य ड...
ऑनलाईन शिक्षण आणि आपण
विशेष लेख, शैक्षणिक

ऑनलाईन शिक्षण आणि आपण

 डॉ. किरण मोहिते २०२० साली महाराष्ट्रात (corona virus) करोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. करोना आणि (Lockdown) टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. करोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील? याची चर्चा विविध व्यासपीठावर घडली. त्यात प्रामुख्यान (Online Education) ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. अशा ऑनलाइन मंचाची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? कोविड-१९ (Covid-19) ने सर्वच क्षेत्रापुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले त्यास शैक्षणिक क्षेत्र ही अपवाद नाही. करोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवणे हा हेतू होता या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ...
युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन

आयआयएमएसच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न पिंपरी : युवकांनी महाविद्यालयीन काळापासूनच करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता 'उद्योजक' हा देखील भक्कम पर्याय असून शकतो यादृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ दत्तात्रय आंबुलकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन - एआयसीटीई चा इनोव्हेशन विभाग व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'उद्योजकता- करिअरचा पर्याय' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात उद्योजकतेची तयारी कशी करावी, उद्योजक म्हणून तयार होण्यासाठी कोणत्या अटी आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? उद्योजकतेमध्ये भविष्यातील आणि अपयशाच्या शक्यता काय ...
प्रा. दत्तात्रय लोखंडे यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२१ पुरस्कार जाहिर
पुणे, शैक्षणिक

प्रा. दत्तात्रय लोखंडे यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२१ पुरस्कार जाहिर

पुणे : ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार मिळालेले पुणे जिल्ह्यातील दत्तात्रय लोखंडे हे पहिले प्राध्यापक ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांना घोषित करण्यात आला आहे. जगभरामधून शैक्षणिक क्षेत्रात मौल्यवान आणि अप्रतिम कामगिरी आणि समाजाप्रती विकास पैलूची विशिष्ट बांधिलकी केल्याबाबत त्यांना हे जागतिक नामांकन मिळाले आहे. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. जगभरामधली ११० विविध देशामधले विजेत्यांच्या नामांकनमध्ये भारतीय विजेत्यामध्ये प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांची निवड करण्यात आली ‘तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याच...