समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. प्रकाश पवार
औंध-पुणे (लोकमराठी) : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुण, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, "समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून, समाजपरिवर्तनाची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी अनेक माणसे चैत्यभूमीला भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार समजून घेऊन आत्मसात करायला हवेत. महात्मा जोतीराव फुले म्हणायचे जशी शेतीला पाण्याची गरज असते. तशीच...