विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
हडपसर (प्रतिनिधी) : विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 ही स्पर्धा दि. 5 व 6 डिसेंबर 2022 रोजी BJS कॉलेज वाघोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवणारे महाविद्यालय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला.
विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक लोकनृत्य (folk dance) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक एकांकिका (one act play) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक मूकनाट्य (Mime) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक प्रहसन (skit) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक कात्रण (collage) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाच्...