एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम संपन्न

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे 'इंडियन स्वच्छता लीग' उपक्रम संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या वतीने ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा, ओला व सुका कचरा याचे व्यवस्थापन कसे करावे. यासंदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच आपल्या आयुष्यात स्वच्छता कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. सर्व छात्र सैनिकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता करून, ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे व्यवस्थापन केले. या उपक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे विभागप्रमुख प्रा.के.बी. पठाडे व सदस्य प्रा. स्वप्निल ढोरे यांच्यासह ४२ छात्र सैनिकांनी सहभाग घेतला.