शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कॅन्टीनचे उद्घाटन 
शैक्षणिक

औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कॅन्टीनचे उद्घाटन

औंध : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कॅन्टीन व्हावी. यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या सोबत सतत तीन वर्षे रयत विद्यार्थी परिषद पाठपुरावा करत होते. त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले असून महाविद्यालयात कॅन्टीन सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या कॅन्टीन उदघाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्था सातारा पश्चिम विभागाचे अधिकारी पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्रचार्य रमेश रणदिवे, औंध कुस्ती संघाचे विकास रानवडे, अभिराज भडकवाड, केदार कदम, मोहसीन शेख, महाविद्यालय क्रीडा व शिस्त समितीचे अध्यक्ष बी. एस. पाटील, रयत विध्यार्थी परिषदेचे मुख्य संघटक ऋषिकेश कानवटे व सचिव राजू काळे, महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, औंध परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मनीष रानवडे हे महाविद्यालयीन कॅन्टीनचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत...
समाजोपयोगी संशोधन करावे – डॉ. एन. एस. गायकवाड
पुणे, शैक्षणिक

समाजोपयोगी संशोधन करावे – डॉ. एन. एस. गायकवाड

हडपसर, ता. १ सप्टेंबर (प्रतिनिधी) : संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या हातून समाजोपयोगी संशोधन घडायला हवे. आपण लोकांच्या कल्याणासाठी संशोधन करावे. जर आपण गुणवत्तापूर्ण संशोधन केले तर त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते. महात्मा जोतीराव फुले, संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान आजही उपयुक्त आहे. मार्गदर्शकाने स्वतःची गुणवत्ता राखून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला पाहिजे. असे विचार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी पीएच.डी. सिनोप्सेस सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. अरुण कोळेकर, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे तज्ञ व्यक्ती म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नम्रता म...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर, ता. २८ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी नामांकित कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी मंडळ विभागामार्फत विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. इतिहास विभागामार्फत 'इन्कलाब' हा माहितीपट दाखविण्यात आला. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 'विभाजन विभिषीका स्मृतिदिनानिमित्त' इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत म...
महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे

डॉ. कैलास जगदाळे पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्था, महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथून नुकतेच रुजू झाले आहेत. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी रयत शिक्षण संस्थेत २२ वर्षे वनस्पतीशास्त्र या विषयाचा विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. याचीच दखल म्हणून रयत शिक्षण संस्थेने २० सप्टेंबर, २००७ रोजी प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली. गेल्या १५ वर्षांपासून एक कार्यक्षम प्राचार्य म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, लोणंद, मंचर, उंब्रज, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक, मूल्यात्मक, ज्ञानात्मक व विवेकवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, रेमेडीयल कोच...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा

रहाटणी, ता. १५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल रहाटणी. (New City Pride English Medium School) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या प्रांगणातून शिवार चौक, शिवार चौक ते शाळा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. "जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता कि जय, हर घर तिरंगा स्वतंत्रता का लगाओ नारा" अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कॅप्टन साहिल बलोत्रा (औंध मिल्ट्री कॅम्प) याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी वसंत चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, रणजित बागल (नाईक) (औंध मिल्ट्री कॅम्प), सुरेश भालेराव (माजी पोलीस निरीक्षक), आर. डी. भालेराव (जेष्ठ नागरिक), सिमा शर्मा (वकील, पिंपळे सौदागर ), संजय सोनार, ट्...
यशस्वी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

यशस्वी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पिंपरी, ता. १५ : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कूल व यशस्वी बालक मंदिर मध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाने आदर्शनगर, फातिमानगर, गंधर्व नगरी परिसरामध्ये काढलेल्या प्रभात फेरीत "भारत माता की जय" घोषणांनी परिसर न्हावून निघाला. ध्वजारोहण यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या जयमाला ठोबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते, संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independent day) विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. तसेच निकिता कुऱ्हाडे, श्वेता हरणे, कोलम पुंडकर, पार्थ येवले, अमित तेलगे, मोनिका चव्हाण, शालिनी उनवणे, योगेश्वर बिर...
अभिमान स्कूलमध्ये बालचमूंचे स्वागत
शैक्षणिक

अभिमान स्कूलमध्ये बालचमूंचे स्वागत

निगडी : प्राधिकरणामधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी स्टीकरच्या माध्यमातून केले. वर्ग सुशोभित करण्यात आले होते. फुले, फुगे, स्टीकरर्स असे रंगबिरंगी सजावट करण्यात आली होती. मुलांसोबत शिक्षकांनी ही बालनृत्य केले. पहिल्याच दिवशी चॉकलेट देऊन मुलांचे तोंड गोड केले. वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांने ज्या स्टीकरची निवड केली त्यानुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सहावीच्या व सातवीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून मुलांचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांचे असे स्वागत बघून सर्वच बालचमू आनंदी व उत्साही दिसत होते. या सर्व कार्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व कार्यकारिणी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्या...
रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराजांना अभिवादन
शैक्षणिक

रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते किरण लोंढे, बाळासाहेब शेंडगे, राहुल गायकवाड, सुमन झेंडे, सुरेश पठाडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर अरुण चाबुकस्वार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कळसाईत यांनी केले व सिल्व्हनिया जाधव यांनी आभार मानले....
माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अविभाज्य भाग आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अविभाज्य भाग आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील पिंपरी : “महाविद्यालयाच्या नावलौकिकाच्या दृष्टीने अनेक घटक कार्यरत असतात. जसे की महाविद्यालयाचे शिक्षण, ते देणारा गुणवंत प्राध्यापक वर्ग, इमारत, विद्यार्थी संख्या इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे माजी विद्यार्थी. हा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण येथून शिक्षण घेऊन गेलेला माजी विद्यार्थी बाहेरच्या जगात आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित असतो. व त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडत असते.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे केले. जालिंदर काकडे , माजी विद्यार्थी संजय गायके, प्रहार संघटना माजी विद्यार्थी महात्मा फुले महाविद्यालयाचा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ नुकताच या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड...
न्यू प्राईट स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

न्यू प्राईट स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका असावरी घोडके, पुरुषोत्तम गाणार युवराज प्रगणे तात्या शिनगारे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सचिन कळसाईत व सुनंदा साळवी यांनी आभार मानले....