
15SepNo Comments
दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही – वैशाली काळभोर
पिंपरी, ता. १५ : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करीत त्यांचा आदर केला जातो. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेवून आम्ही महिला लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण आणि राजकारणात काम करीत आहोत. या महाराष्ट्रात मनुवादी विचारांच्या भाजपने यापूर्वीही महिलांबाबत निंदाजनक वक्तव्य केले आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांचा पुन्हा अपमान केला आहे त्यांनी तमाम महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावे...

11SepNo Comments
साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई, दि ११ : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले....

10SepNo Comments
Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी
मुंबई : प्रसिद्ध लालबागचा राजा दरबारात पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर लालबागचा राजा मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत.
'हात काय, पाय पण लावेन…
पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात ...

24AugNo Comments
माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे
मुंबई : माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. असे वक्तव्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक पेजवरून आपले म्हणणे मांडले आहे.
दरम्यान, मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ...

6FebNo Comments
महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
रायगड : भोर-महाड या रस्त्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रायगड किंवा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या चिटफंड चालकासी मिळते जुळते वर्णन असल्याने नातेवाईक महाडला रवाना झाले असल्याचे कळते आहे. ...
30SepNo Comments
#COVID-19: कर्जतमध्ये १३ आरोपीसह ४२ जण कोरोना बाधित
अहमदनगर : कर्जत तालुक्यात बुधवारी ४२ रूग्ण कोरोना (covid-19) सापडले आहेत. त्यामध्ये सबजेलमधील १३ आरोपींचा समावेश आहे. रविवारी (ता. २७) कर्जत पोलिस ठाण्यातील सात पोलिस तर राशीन पोलिस ठाण्यातील एक पोलिस कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याअनुषंगाने सबजेलमधील १९ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा आरोपी कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, कर्जत तालुक्यात एकुण १३३३ कोरोना रूग्णांपैकी १०६२ रूग्ण बरे झाले असून २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रूग्णांचा गावानुसार तपशील खालीलप्रमाणे :
1.कर्जत-04
2.दुरगाव-03
3.कुळधरण - 01
4.चापडगाव - 02
5. खांडवी- 01
6.नेटकेवाडी - 01
7.निमगाव गांगरडा-02
8.अळसूनदे-04
9.मिरजगाव-02
11.चिंचोली काळदात-02
12.राशीन-01
13.बहिरोबावाडी-02
14.रुईगव्हान-01
15.सितपु...

14SepNo Comments
भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण
आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत.
त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे.
https://twitter.com/ndtv/status/1305210425336709126?s=19...

15MayNo Comments
कोविड योध्दा डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
प्राधिकरणवासीय व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने डॉक्टर राजेश यांचा सेवेनिमित्त अनोखा उपक्रम संपन्न.
पिंपरी : ५५ दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोविड १९ विषाणूच्या युद्धात सहभागी असलेले डॉक्टर राजेश पाटील यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती मंगलाताई एस. घाळी, संपर्क प्रमुख विजय मुनोत, आकुर्डी गंगानगर विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण, साईराज कॉलनी येथील प्रशांत शिंपी, महिला प्रमुख अर्चना घाळी, समिती अध्यक्ष विजय पाटील,अमित डांगे,बाबसाहेब घाळी उपस्थित होते.
त्यांच्या वाढदिवसानिमित प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने चिंतामणी चौक, स्पाइन रस्ता, प्राधिकरण व निगडी परिसरात परप्रांतीय मजूर व कामगार कुटुंबियाना फळे, ग्लिकोज पावडर, मास्क, सॅनिटायझर बॉटल याचे वाटप करण्यात आले. सदरचे वाटप सुरू असताना डॉक्टर राजेश ...

8MayNo Comments
ग्लोबल इनोव्हेशन चेंजमेकर – प्रोफेसर डॉक्टर संजय राउत ( Prof. Dr. Sanjay Rout )
भारत हा जगासाठी नेहमीच ज्ञानाचा सागर आहे. ग्लोबल इनोव्हेशन चेंजमेकर आहेत अशा आश्चर्यकारक हिरेच्या निर्मितीचे देशात साक्षीदार आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा गौरव वाढवणाऱ्याअशा तेजस्वी रत्नांपैकी एक म्हणजे प्रोफेसर डॉक्टर संजय राउत ( Prof. Dr. Sanjay Rout ) हे एक नाविन्यपूर्ण, संशोधक आणि भविष्य विचारक आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की शक्यतेची मर्यादा शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या पलीकडे अशक्यतेत जाणे होय. प्रोफेसर डॉक्टर संजय राउत ( Prof. Dr. Sanjay Rout )
अलीकडेच त्याना जगातील अव्वल 50 फ्यूचर थॉट लीडर, थिकर्स 360 द्वारा आणि एमयूजीयू इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सर्वोत्कृष्ट अभिनव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रोफेसर संजय कुमार राऊत हे प्रख्यात ग्लोबल सायंटिस्ट आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनीअनेक उपाध्या प्राप्त केल्या आहेत। त्यांनी संशोधक, मार्गदर्शक, ल...