महाराष्ट्र

Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार
सामाजिक, महाराष्ट्र

Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे. या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हनुमंत ...
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत आहे मुंबई, ता. २० : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद ...
पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल एनयुजेएम ची पत्रकाराला साथ! नाशिक : नाशिक येथील दैनिक सकाळ च्या नाशिक आवृत्तीचे नवीन नाशिक म्हणजेच सिडको विभाग प्रतिनिधी प्रमोद दंडगव्हाळ यांना भाजपा नगरसेविकेचे पती कैलास आहिरे यांनी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल राग येऊन गंभीर स्वरूपाची इजा करण्याच्या व मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेचा पति कैलास आहिरे याच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधान कलम सहिते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना याप्रकरणी पोलीस आणि पत्रकार व्हाट्सअप ग्रुप वर माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार आज संध्याकाळी अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार प्रमोद दंड गव्हा...
Covid-19: प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव, अहमदनगर आणि सोलापूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त
महाराष्ट्र

Covid-19: प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव, अहमदनगर आणि सोलापूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई, ता. 19 : राज्यातील अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्‍ज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची सांगली येथे कोविड -19 नियंत्रणासाठी यापूर्वीच नेमणूक करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात कोविड -19 प्रसारास चांगले यश आले आहे.आता डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण हे अहमदनगर ये...
औरंगाबादमधील गरजू विद्यार्थ्यांना एस.टी. कॉलनीतील महिलांकडून जेवणाची व्यवस्था
महाराष्ट्र

औरंगाबादमधील गरजू विद्यार्थ्यांना एस.टी. कॉलनीतील महिलांकडून जेवणाची व्यवस्था

प्रत्यक्ष स्वयंपाक करुन पुरुषदेखील महिलांना मदत करतात औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या होत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. अनेक जण राज्यभरातून औरंगाबाद येथे शिकण्यासाठी येतात, परंतु संचारबंदी असल्याने शहरातील अनेक विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन एस. टी. कॉलनी (मुख्य बसस्थानकाजवळ) महिलांनी या विद्यार्थ्यांना दररोज मोफत पोळ्या - भाजी देण्याचे ठरवले. तसेच प्रत्यक्ष स्वयंपाक देखील करुन कॉलनीतील पुरुषांनी आवश्यक ती मदत करुन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम या महिला करत आहेत. १२ दिवसांपूर्वी काॅलनीतील महिलांनी प्रत्येकी १० पोळ्या गरजू विद्यार्थ्यांना पाठवण्याचे ठरवले होते. ३ दिवस हा उपक्रम चालवण्यानंतर या महिलांना लक्षात आले की, केवळ एवढे करुन चालणार नाही. नंतर एकत्रित येऊन श...
लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

मुंबई, (लोकमराठी) : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र, मोठी बातमी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, ता. 16 (लोकमराठी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. https://youtu.be/OBATQJ5cZC0 याला सकारात्मक प्रतिसाद देऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला....
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या स्थितीत सर्व अत्यावश्यक सेवा कोरोनाविरोधात एखाद्या योद्याप्रमाणे लढत आहेत. इतर सर्वाना सुरक्षा कवच आहे. सरकार काळजी घेत आहे. मात्र, यातून लोकशाहीचा चौथा स्तंभ दुर्लक्षित राहिलाय. शासनाने कामगार हिसाठी अध्यादेश काढून निर्देश जारी केलेत. तरीही प्रसारमाध्यमकर्मी पुरेसे सुरक्षित नाहीत. काही पत्रकारांना या विषाणूची बाधा झाल्याच्या बातम्या पसरू लागताच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याची मागणी केली आहे. पण ही तपासणी पुरेशी नाही. यासोबत सर्व प्रसारमाध्यम व्यवस्थापन मालकांना खडबडून जागे करण्याची आणि जे मालक व व्यवस्थापन, वरिष्ठ माध्यम कर्मचारींच्या सुरक्षेत हयगय करत असतील आणि बातम्यांसाठी चुकीचा आग्रह धरत असतील अशांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रने केली आहे. याबाबत अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्य...
दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत
महाराष्ट्र, सामाजिक

दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत

एनयुजेएमचे सदस्य नगरचे पत्रकार जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सुदाम लगड यांचे अभिनंदनीय काम लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहर व परिसरात लॉकडाउनमुळे रोजीरोटी बंद झालेल्या शंभर कुटुंबीयांना दररोज अन्न-धान्य, किराणामाल व मोफत जेवण देण्याचे ध्येय मनाशी बाळगून दोन तरुणांनी पंधरा दिवसांपासून काही मित्रांच्या देणगीच्या सहकार्यातूंन ही मोहीम सुरु केली. आता दररोज किमान पन्नास कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. त्यांना मित्र परिवाराकडून शंभर रुपयांपासून ते थेट पाच हजारांपर्यंत मदत झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील पत्रकार नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सदस्य जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सचिव सुदाम लगड या तरुणांकडून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे अन्न-धान्य आणि किराणा अशा गरजू लोकांना दिला जात आहे. त्यासाठी त्यांना काही सामाजिक संस्थांचीही मदत मिळत आहे. या युवकांच्या माध्यम...
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण
महाराष्ट्र

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण

लोकमराठी : महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता हे प्रसारण होईल. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली आहे. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शोषित, वंचित वर्गासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर आधारित हा चित्रपट विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. विविध भाषांमधून हा चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यत पोहोचला आहे. येत्या मंगळवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मराठी भाषेतून ड...