महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा – अभिनेते देशमुख
महाराष्ट्र, मनोरंजन

डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा – अभिनेते देशमुख

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा. असे आवाहन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते सागर देशमुख यांनी जनतेला केले आहे. दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र, सद्या परिस्थितीत समस्त भारतीयांनी, त्यांच्या अनुयायांनी आपल्या घरातच राहून त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व प्रेम अर्पण करावे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या हितासाठी जे निर्देश दिले आहेत. त्यांचे पालन करीत घरातच राहण्याचे आवाहन...
मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 : कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉकटर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील. आज या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्याया कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले. या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 मृत्यू आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते. राज्यातला वाढता मृत्य...
सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई
मोठी बातमी, महाराष्ट्र

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई

गृहमंत्री देशमुख यांचा समाजकंटकांना इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 (Lokmarathi) : काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडीयाचा (समाज माध्यम) दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. कोरोना साथीमुळे असलेल्या लॉकडाऊन दरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना श्री. देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत. पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध लॉकडाऊनच्या कालावधीत 176 गुन्हे नोंदविले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये द्वेष...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त | येथे करा तक्रार
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त | येथे करा तक्रार

राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरूएका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद१६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई ता, १२ (लोकमराठी) : राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. काल एका दिवसात (११ एप्रिल २०२०) राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथे करा तक्रार अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता रा...
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन
महाराष्ट्र, मोठी बातमी

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन

लोकमराठी : राज्यभरातील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन करून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर निर्णय घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्यभरातील काही लाख विद्यार्थ्यांशी संबंधित हा विषय असल्याने राज्य शासन याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा प्रश्न आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा अडचणीत आल्या. त्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या परीक्षा पद्धतीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. विद...
व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित; जाणून घ्या काय आहेत नियम
मोठी बातमी, महाराष्ट्र

व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित; जाणून घ्या काय आहेत नियम

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई ता. ११ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे. मार्गदर्शिका प्रकाशितसध्याच्या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात समाजमाध्यमांवर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सअपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज,पोस्ट्स पाठवून व महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अ...
#Lockdown : किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

#Lockdown : किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (लोकमराठी) : महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन कायम राहील असे त्यांनी सांगितले. “हा लॉकडाउन कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते तुमच्या हातामध्ये आहे. शिस्त तुम्ही पाळली पाहिजे. आपल्याला करोना व्हायरसची साखळी तोडायची आहे. तरच आपण यातून लवकर बाहेर पडू. आपण हा साखळदंड तोडूच” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहील हे सांगताना त्यांनी किमान या शब्दावर विशेष भर दिला. भाजीमंडई किंवा अन्य कुठेही तुम्ही गर्दी केली नाही तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाउनमधून बाहेर पडता येईल असे त्यांनी सांगितले. किमान शब्द वापरताना त्यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. करोन...
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा निधी
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा निधी

मुंबई (लोकमराठी): 'कोरोना' विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी तर बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्यावतीने जमा केलेला 22 लाख 75 हजार रुपयांचा 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19' साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ग्रामविकास मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला. संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री सहाय्यता निध...
करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र, मोठी बातमी

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई (लोकमराठी) : महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल....
महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता घ्या; आंबेडकर यांचे आवाहन
महाराष्ट्र

महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता घ्या; आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई (लोक मराठी) : सार्वत्रिक आंबेडकर, फुले जयंती होणार नाही याची दक्षता घ्या, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. “११ एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी दोन्ही जयंती एकत्रित साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसने भारतासह जगाला भेडसावलं आहे. त्यामुळे लोक चिंतीत आहे. कोरोना व्हायरसला रोखायचं असेल तर अंतर ठेवून वागायचं. मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, यंदा जयंती घरातच साजरी करावी. जयंती कशी साजरी केली याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन सांगा. परंतु महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे” असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले....