ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”
यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभवलोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्धमृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदीलोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वादमहिला कुस्त्याचा आनंद
मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष...










